नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात 22.14%
तर दुपारी एक वाजेपर्यंत 7 लाख 35 हजार हून अधिक मतदारांनी म्हणजे 37.33% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून भर उन्हात एक वाजेनंतरही उत्साह दिसून आला. हाच उत्साह दुपारनंतर राहिला तर एकूण मतदान 65 टक्क्यांच्या पुढे होईल असे दिसत आहे.
दरम्यान, भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना विजय कुमार गावित, मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, काँग्रेस उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी, माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी यांच्यासह प्रमुख उमेदवार आणि नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना विजयकुमार गावित निवडणूक लढवत असून खानदेशातील लक्षवेधी उमेदवारांपैकी त्या एक आहेत. त्यांनी सकाळी नऊ वाजता नंदुरबार शहरातील डी आर हायस्कूल येथील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. देशाचे नेतृत्व निश्चित करणारी ही निवडणूक आहे आणि मतदार सुज्ञपणे तसा निर्णय घेणारे मतदान करतील व पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता दिसेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी माध्यमांसमोर व्यक्त केला. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील नटावद येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि म्हणून प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्य बजवावे असे डॉक्टर गावित यांनी माध्यमांसमोर बोलताना आवाहन केले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील पातोंडा गावी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मिळेल ते साधन घेऊन वेळात वेळ काढून मतदान केंद्रावर पोहोचावे आणि मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे डॉक्टर सुप्रिया यांनी आवाहन केले. काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी आणि माजी मंत्री एडवोकेट पाडवी यांनी धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव असली येथे मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी मतदार योग्य भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी देखील नंदुरबार येथे मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, अकरा वाजेपर्यंत झालेल्या मतदानात अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील 69 हजार 673 म्हणजे 22.77% मतदान झाले. तर एक वाजेपर्यंत 35.46% झाले. अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांची संख्या अधिक म्हणजे 23 टक्के होती. अन्य विधानसभा क्षेत्रात मात्र तुलनेने काहीशी कमी दिसली. अकरा वाजेपर्यंत च्या पहिल्या टप्प्यात शहादा विधानसभा क्षेत्रात 23.96% तर एक वाजेपर्यंत 37.92% मतदारांनी हक्क बजावला. येथेही पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे अधिक मतदान दिसले.
नंदुरबार विधानसभा क्षेत्रात 11 पर्यंत 18% म्हणजे 61 हजार 762 तर 1 पर्यंत 34.97%, नवापूर विधानसभा मतदार संघात 27.63% मतदारांनी म्हणजे 80 हजार130 तर 1 पर्यंत 46.01%, साक्री विधानसभा क्षेत्रात 1पर्यंत 36.71% तर शिरपूर विधानसभा मतदारसंघात 34.01% मतदारांनी हक्क बजावला. संपूर्ण नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अशा प्रकारे 1 वाजेपर्यंत अत्यंत उत्साहात जोरदारपणे मतदान होताना दिसले.
हेही वाचा –