नांदेड पुढारी वृत्तसेवा: मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची सभा वाडी पाटी जिजाऊ नगर येथील १११ एकरच्या भव्य मैदानात होत आहे. सभेच्या निमित्ताने मराठा समाज बांधवामध्ये मोठा उत्साह संचारला आहे. हजारो समाजबांव, भगिनींचे जत्थेच्या जत्थे सभास्थळाकडे रवाना होत आहेत.
सभास्थळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.साधारणत: पाच लाख समाजबांधवांची उपस्थिती सभेला राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व्यासपीठावर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. पोवड्याचे स्वरांमुळे उपस्थित समाजबांधवांमध्ये उत्साह संचारला आहे.जरांगे पाटील यांच्या सभेसाठी येणा-या समाजबांधवासाठी ठिकठिकाणी अन्नदान खिचडी वाटप करण्यात येत आहे.
हेही वाचा