Latest

Namdeo Dhondo Mahanor : …तेव्हा महानोरांनी राज ठाकरेंची केली होती ‘पुलं’ सोबत तुलना   

सोनाली जाधव

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : २०१९च्या निवडणुकीवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची तुलना ना. धों. महानोर यांनी आणीबाणीनंतर पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या भाषणासोबत केली होती. २०१९ च्या निवडणुकांत लाव रे ती कॕसेट चांगलीच गाजली होती. या वेळी महानोरांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. ( Namdeo Dhondo Mahanor ) राजकीय वर्तुळात या पत्राची बरीच चर्चा झाली. त्या पत्राची तेव्हा चर्चा झाली होती.

ना.धों. महानोर यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिले. या पत्रात महानोर लिहितात. "व्यंग दाखवण्याची व सडेतोड चिरफाड करण्याची आपली कला जन्मजात आहेच. आणीबाणीच्या प्रचंड अस्वस्थतेनंतर निवडणुका आल्या. आदरणीय पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेऊन चिरफाड केली. ही महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आपण करत आहात.

आणीबाणी १९७५ मध्ये लागू करण्यात आली होती. १९७७ मध्ये निवडणुका झाल्या. आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर प्रचंड प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. बोलण्यावर, लिहिण्यावर गदा आली होती. आम्ही करतो ते बरोबर, तुम्ही करता ते चुकीचं अशी सरसकट भूमिका इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेणाऱ्यांना थेट जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. शेती आधारीत अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती. सामान्य नागरिकांची फरफट होत होती याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. त्या काळात पु.ल.देशपांडे यांनी सभा घेतली होती. तशीच भूमिका  घेत आहात, असेही महानोर यांनी  पत्रात नमूद केले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT