पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'झुंड'चा टीजर (Jhund Teaser) रिलीज झाला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आपल्या 'झुंड' सोबत ४ मार्चला दमदार एन्ट्री घ्यायला तयार आहे. चित्रपटगृहामध्ये झुंड (Jhund Teaser) रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये अमिताभ मुलांच्या ग्रुपसोबत दिसत आहेत. अमिताभ यांच्याशिवाय काही यंगस्टर्स दिसत आहेत. ते वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून संगीत बनवत असतात.
हा चित्रपट नागराज पोपटराव मंजुळेचा पहिला हिंदी दिग्दर्शित चित्रपट आहे. नागराजने याआधी मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट सैराट आणि फँड्रीमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याचा झूंज हा चित्रपट ४ मार्च राेजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर २०१८ मध्ये नागपूर येथे झाले होते. स्टार 'झुंड'च्या निर्मात्यांनी अधिकृत फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च केले होते.
'झुंड' हा एक हिंदी क्रीडा चित्रपट आहे. झोपडपट्टी सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका प्राध्यापकाची भूमिका साकारत आहेत. रस्त्यावरच्या मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करून फुटबॉल संघ सुरू करतो, अशी त्यांची भूमिका आहे.
झुंडची कहाणी 'स्लम सॉकर फाउंडेशन' चे संस्थापक आणि कोच विजय बरसे यांच्या कहाणीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन विजय बरसे यांच्या व्यक्तीरेखेत असतील. चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज, तांडव फिल्म्स एंटरटेनमेंट आणि आटपत बॅनर अंतर्गत करण्यात आलं आहे.
हेही वाचलं का?