पुढारी ऑनलाइन डेस्क : Krishna Sagar Lake Incident : गुजरातच्या बोताड शहराबाहेरील कृष्णसागर तलावात आज 5 मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.13) दुपारी घडली. एएनआयने याचे वृत्त दिले आहे.
बोताडचे एसपी किशोर बलोलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णसागर तलावात दुपारच्या वेळी २ मुले पोहत असताना बुडू लागली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर ३ जणांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली पण तेही बुडाले. सर्वांचे वय 16 ते 17 वर्षे दरम्यान आहे. पुढील तपास सुरू आहे. Krishna Sagar Lake Incident
हे ही वाचा :