मुंबई : पुढारी वृत्तसेवा;महाविकास आघाडीच्या मुंबईतील शनिवारच्या हल्लाबोल मोर्चासाठी जोरदारी तयारी करण्यात आली असून, सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा असेल. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह आघाडीसोबत असलेले छोटे पक्ष, पुरोगामी संस्था, संघटना रस्त्यावर उतरतील आणि हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन आणि विरोधकांची एकजूट अधोरेखित करतील. (MVA's 'Halla Bol Morcha' )
भाजपकडून महापुरुषांचा होणारा अवमान, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची चिथावणीखोर भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणे आणि लोकशाहीचे रक्षण आदी मुद्द्यांवर हा मोर्चा असणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हा मोर्चा काढला जात असून त्याने सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. शुक्रवारी पोलिसांनी काही अटी, शर्तीसह या मोर्चाला परवानगी दिल्याने गुरुवारपासूनचा संभ्रम दूर झाला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी मोर्चाच्या तयारीची पाहणी केली. या मोर्चात एक लाखाहून अधिक लोक सहभागी होतील, असे नियोजन आहे.
या मोर्चामुळे भायखळा ते सीएसएमटी स्थानकापर्यंतचा मुख्य रस्ता व्यापला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली आहे. या मोर्चात विरोधी पक्षातील सर्वच प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील सहभागी होणार असून सभास्थानी शरद पवारही दाखल होण्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप मोर्चा सांभाळतील. याशिवाय समाजवादी पार्टी, डावे पक्ष, संघटनाही मोर्चात सहभागी होणार आहेत.महाविकास आघाडीचा हा पहिलाच मोर्चा यशस्वी करण्याचा चंग तीनही पक्षांनी बांधला आहे. मुंबईतून सर्वाधिक कार्यकर्ते जमविण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे. याशिवाय ठाणे, पालघर, नवी मुंबई या महानगर क्षेत्रासह लगतच्या नाशिक, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांतून तीनही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत. याशिवाय राज्यभरातून कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यांच्या प्रमुख नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने शिनवारी आयोजित केलेल्या महामोर्चाला अखेर मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांनी १४ अटी घातल्या आहेत. त्या अशा-
कायदा पाळा
मोर्चाला परवानगी देण्यात पोलिसांना अडचण असण्याचे कारण नाही. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी ठरलेल्या मार्गानुसार हा मोर्चा काढावा. तो शांततेच्या मार्गाने निघून –
कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे. (देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री)सामान्य माणसाचा राग मोर्चात दिसेल
या मोर्चासंबंधी लोकांत औत्सुक्य आणि राग आहे. जबाबदार लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब मनात राग आहे. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल, हा मला
आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने झाल्याने सामान्य माणसाच्या
विश्वास आहे.
(शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. व्यासपीठ उभारण्याची परवानगी नसल्याने एका ट्रकवरच छोटे व्यासपीठ उभारले जाणार असून तिथूनच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भाषणे होतील.
हेही वाचा