पिंपळनेर :पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील वार्सा शिवारात काल सायंकाळी एका वृध्द इसमाचे धडावेगळे केलेले शिर (Murder) गावालगतच्या शेतात आढळून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय मयताची ओळख पटवित त्याच्या भावाची फिर्यादही दाखल करून घेतली आहे.
याबाबत माहिती अशी की, काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वार्सा शिवारातील धाकलु जिवल्या राऊत यांच्या शेतात एका इसमाचे धड आणि शिर वेगळे केलेले आढळून आल्याने सपोनि. सचिन साळुंखे यांनी फौजफाट्यानिशी घटनास्थळ गाठले. मयताच्या अंगावर आंतरवस्त्र सोडले तर कुठलाही कपडा नव्हता. त्यामुळे मयताची ओळख पटविणे पोलिसांना आव्हान ठरले होते. तथापि. परिसरात तपास करीत पोलिसांनी या अनोळखीची ओळख पटवली. मयत इसम हा वंशा पांडू सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले. या ६० वर्षीय वृध्दावर धारदार हत्याराने वार करीत त्याची मान शरीरापासून वेगळी केलेली होती. तसेच त्याचे प्रेत गावालगतच्या शेतात पडलेले होते. (Murder)
एक लहान मुलगा वाटाण्याच्या शेंगा तोडण्यासाठी गेला असता मृतदेह पडलेला दिसला. त्याने ही बाब काहिंना सांगितली. मयताचा भाऊ मांगळ्या पांडू सोनवणे याची पिंपळनेर पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत काल रात्री पावणेबाराच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल केला. सपोनि. सचिन साळुंखे पुढील तपास करीत आहेत. (Murder)
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.