Latest

Danoli Murder : कोल्हापूर : युवकाचा खून; कचर्‍यात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

backup backup

जयसिंगपूर/दानोळी ; पुढारी वृत्तसेवा : दानोळी (ता.शिरोळ) येथून बुधवारपासून बेपत्ता असलेल्या प्रशांत संजय भिसे (वय २८) या युवकाची मोटरसायकल गुरूवारी विहिरीत आढळून आली होती. त्या पाठोपाठ आज शुक्रवारी कोथळी (ता.शिरोळ) गावच्या हद्दीत भिसे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. (Danoli Murder)

दरम्यान, बुधवारी रात्री मित्रांच्या झालेल्या वादातून भिसे यांचा खून करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक संशयीत जयसिंगपूर पोलिसात हजर झाला आहे. या घटनामुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली असून अधिक शोध जयसिंगपूर पोलिस घेत आहेत.

Danoli Murder : कचर्‍याच्या ढिगार्‍यात प्रशांत यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री दोन वाजल्यापासून प्रशांत भिसे हा बेपत्ता असल्याची नोंद गुरूवारी जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळी दानोळी-जयसिंगपूर रोडवरील खर्डेकर यांच्या विहिरीत प्रशांत यांची मोटरसायकल आढळून आली होती. जयसिंगपूर पोलिसांनी दोरखंडाच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीतील पाणी तीन मोटरी लावून उपसण्यात आले. पण प्रशांतचा पत्ता लागला नव्हता.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ सुमारास कोथळी (ता.शिरोळ) येथे मंगोबा देवालय रस्त्या लगत कचर्‍याच्या ढिगार्‍यात प्रशांत यांचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आला. घटनास्थळी यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पथकाने धाव घेवून घटनेची पाहणी करून घटनास्थळी शवविच्छेदन केले.

मित्रांच्या वादातून खून

बुधवारी रात्री मित्रांच्या झालेल्या वादातूनच हा खून झाला आहे. मित्रांनीच त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. यातील एक संशयीत जयसिंगपूर पोलिसात हजर झाला असून अन्य दुसर्‍या संशयिताचा शोध जयसिंगपूर पोलिस घेत आहेत. यावेळी पो. कॉ. विजय पाटील, निलेश मांजरे, बाबाचँद पटेल, अस्लम मुजावर, मंगेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT