पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध ओडिया गायक मुरली महापात्रा यांचे एका लाईव्ह कार्यक्रमात निधन झाले. (Murali Mohapatra Death) ओडिशाच्या कोरापुटमध्ये दुर्गा पूजा सांस्कृतिक कार्यक्रमात परफॉर्मन्स देण्यासाठी स्टेज होते. त्यांची तब्येत ठिक नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, महापात्रा यांची तब्येत ठीक नव्हती आणि जयपूर शहर (ओडिशा) मध्ये चार गाणी गायल्यानंतर ते अचानक मंचावर खुर्चीवर बसले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (Murali Mohapatra Death)
गायक मुरली महापात्रा (Murali Mohapatra) चा भाऊ बिभूति प्रसाद महापात्राने सांगितले की, ओडिया गायकाचे रविवारी रात्री हार्ट ॲटॅकने मृत्यू झाला. त्यांची प्रकृती आधीच ठिक नव्हती.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मुरली महापात्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त केलं आहे. पटनायक यांनी ट्विट केलं, 'लोकप्रिय गायक मुरली महापात्रा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:खी आहे. त्यांचा गोड आवाज नेहमी श्रोत्यांच्या मनात आनंदाचे भाव उत्पन्न करत राहील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. माझी संवेदना त्यांच्या परिवाराप्रती सोबत आहे.'