Latest

Hindustani bhau : विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलीसांनी उचलले

backup backup

मुंबई : पुढारी ऑनलाईन : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस 13 मधील स्पर्धक विकास जयराम पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ (41) याच्यासह इकरार खान वखार खान मुस्लिम (25) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (Hindustani bhau)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवी कलम 353, 332, 427, 109, 114, 143, 145, 146, 149, 188, 269, 270 यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51(ब) आणि जमाव बंदी आदेश भंग केल्याप्रकरणी कलम 37 (३), 135, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 3 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांवर 'हिंदुस्थानी भाऊ' या नावाने प्रोफाईल असलेल्या पेजवर 10 आणि 12 वी परीक्षार्थीं विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. परीक्षा ऑनलाईन घ्या अन्यथा रद्द करा अशी मागणी करणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. व्हिडीओच्या माध्यमातून 31 जानेवारी रोजी आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असताना 500 ते 600 जणांची गर्दी झाली होती. त्यामुळे याप्रकरणाचा सखोल तपास करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चर्चा करत अखेर धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पाठक आणि मुस्लीम याना अटक केली आहे.

कोरोना नियम मोडल्यामुळे मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षीसुद्धा हिंदुस्थानी भाऊला बेड्याही ठोकल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा, परीक्षा शुल्क माफ करा या मागणीसाठी तो दादरमधील शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला बसला होता. त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला ताब्यात घेत ही कारवाई केली होती.

जनसत्तेच्या एका रिपोर्टनुसार हिंदुस्तानी भाऊ हा मराठी कुटुंबातून पुढे येतो. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे वयाच्या सातव्या वर्षी त्याला हाॅटेलमध्ये वेटरची नोकरी करावी लागली होती. त्याचबरोबर तो घराघरांत जाऊन अगरबत्तीची विक्रीही करत होता. काही जण असं सांगतात की, त्‍याने एका  वृत्तपत्रात नोकरी केलेली होती. क्राईम रिपाेर्टर म्‍हणून त्‍याने पत्रकारितेमध्ये स्वतःची ओळख तयार केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT