मुंबई : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरीमध्ये खलबते सुरू झाली आहेत.
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाऐवजी आपल्याला संघटनात्मक पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून या पदावर अजित पवार यांची वर्णी लावण्याबाबत पावले उचलली जात आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात जेष्ठ नेत्यांचा मोठा गट असल्यामुळे त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवारी किंवा शनिवारी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आले होती. परंतु बुलढाणा जिल्ह्यात खाजगी बसला झालेल्या अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे अजित पवार यांनी आपले शनिवारचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले होते. अखेरीस आता देवगिरीवर बैठक सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
हेही वाचा :