Latest

MI vs PBKS: पंजाब विरुद्ध मुंबई ठरणार का ‘किंग्ज’?

नंदू लटके

अबुधाबी;पुढारी ऑनलाईन: आयपीएलच्‍या या सत्रात मुंबई इंडियन्सचा सलग तीन सामन्यांत पराभव झाला आहे. यामुळे संघाची सातव्‍या स्‍थानावर घसरण झाली आहे. आता बाद फेरीत आपले अस्‍तित्‍व टिकविण्‍यासाठी  मुंबई इंडियन्सला आज पंजाब किंग्‍जला
( MI vs PBKS ) नमवणे अनिवार्य आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता अबूधाबी येथील शेख जायद स्‍टेडियममध्‍ये ( MI vs PBKS ) हा सामना खेळला जाईल.

मुंबई इंडियन्‍सची सातव्‍या स्‍थानी घसरण

यूएईमध्ये आयपीएल सत्राची सुरुवात झाल्यानंतर मुंबई संघाला तिन्ही लढतीत पराभूत व्हावे लागले.त्यामुळे त्यांची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

मुंबई इंडियन्‍सचे  १० सामन्यांत आठ गुण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांना धावांचा पाठलाग करता आला नाही.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ते पहिल्यांदा फलंदाजी करताना पराभूत झाले.

पाचवेळा जेतेपद मिळवणार्‍या या संघाच्या फलंदाजांनी या सत्रात निराशाजनक प्रदर्शन केले आहे.

आकडेवारीत मुंबईचे पारडे जड

दोन्‍ही संघामध्‍ये आजवर एकुण २७ सामने झाले आहेत. यामध्‍ये मुंबईने १४ तर पंजाबने १३ सामने जिंकले आहेत.

दोन्‍ही संघातील मागील सात सामन्‍यांपैकी मुंबईने चार सामने जिंकले आहेत.

फलंदाजांचे अपयशाची मुंबईला चिंता

युएईमधील आयपीएल सत्रात मुंबई इंडियन्‍सचे फलंदाजी दमदार कामगिरी करु शकले नाहीत.

सर्वच फळीतील फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत.

फलंदाजीच्‍या कामगिरीमुळे गोलंदाजांवर दबाव वाढला आहे.

बेंगळूर विरुद्‍धच्‍या सामन्‍यात मुंबईचे तब्‍बल सात फलंदाज हे धावांचा दुहेरी आकडाही पार करु शकले नाहीत.

युएईमध्‍ये इशान किशन, सूर्यकुमार यादव, पोलार्ड, कुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या यांनी आपल्‍या नावाला साजेसी कामगिरी केलेली नाही.

अशातच कर्णधार रोहित शर्माहाही फॉर्ममध्‍ये नाही. पंजाब विरुद्‍धच्‍या सामन्‍यात रोहित शर्माची खेळी संघासाठी महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.

तसेच रोहित आज संघात कोणते बदल करणार याकडेही मुंबई इंडियन्‍स फॅन्‍सचे लक्ष लागले आहे.

राहुल-मयंकच्‍या फलंदाजीवर पंजाबची भिस्‍त

पंजाब संघातील फलंदाजही संघर्ष करत आहेत. निकोलस पूरनसह अन्‍य काही फलंदाजांना या सत्रात दमदार कामगिरी करता आलेले नाही. आजच्‍या सामन्‍यात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्‍या फलंदाजीवर संघाची भिस्‍त असणार आहे.

हैदराबाद विरुद्‍धच्‍या सामन्‍यात पंजाबच्‍या गोलंदाजींनी कमाल केली हेाती.

केवळ १२५ धावसंख्‍या असतानाही हा सामना जिंकला होता.

फिरकी गोलंदाज रवि बिश्‍नोई याने युएईमध्‍ये सर्वात प्रभावी ठरला आहे.

त्‍याचबरोबर मोहम्‍मद शमी आणि अर्शदीप यांनीही चांगले प्रदर्शन केले आहे.

हेही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT