मुंबई: पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाभवन जवळ कारला भीषण आग लागली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मुंबईच्या मध्यवर्ती भागात आज (दि. १) दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीस दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली होती.
कारने पेट घेतल्यावर हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माहिमच्या दिशेने आणि प्लाझाकडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या गाडीतील गॅसचा सुद्धा स्फोट झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता सेनाभवन रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या वाहनांना थांबवण्यात आले आहे. प्लाझा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
हेही वाचलंत का ?