लखनौ; वृत्तसंस्था : कैसरबाग न्यायालयात तारखेवर हजर झालेल्या संजीव माहेश्वरी ऊर्फ जिवा या यूपीतील कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीच्या टोळीतील सदस्याची बुधवारी दुपारी वकिलाच्या वेशात आलेल्या चौघांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबारात एका मुलीसह 4 जण तसेच 2 पोलिस जखमी झाले आहेत. एका हल्लेखोराला उपस्थित खर्याखुर्या वकिलांनी पकडले, हे विशेष! त्याला बेदम मारहाण केली. घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलिस कुमक दाखल झाल्याने न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते. (Mukhtar Gang Shooter Killed)
मुझफ्फरनगरचा कुख्यात गुंड जीवा लखनौ कारागृहात बंद होता. अलीकडेच प्रशासनाने त्याची मालमत्ताही जप्त केली होती. दवाखान्यात कंपाऊंडर ते गँगस्टर असा त्याचा प्रवास होता. अपहरण, खंडणी, हत्या असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. (Mukhtar Gang Shooter Killed)
भाजप नेत्याची हत्या
10 फेब्रुवारी 1997 रोजी भाजपचे दिग्गज नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतही जिवाचे नाव समोर आले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नंतर कृष्णानंद राय खून प्रकरणातही संजीव जीवाचे नाव समोर आले होते.
अधिक वाचा :