Latest

Anant Ambani Radhika Engagement: अनंत अंबानी-राधिकाचा आज साखरपुडा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानीचा आज सायंकाळी साखरपुडा होणार आहे. अनंत अंबानीचा साखरपुडा बिजनेसमॅन विरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चेंटसोबत आज सायंकाळी मुंबईत एंटिलिया येथे पार पडणार आहे. अनंत अंबानी हा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा आहे. सोहळ्याची सर्व तयारीदेखील पूर्ण झाली आहे. राजस्थानमधील श्रीनाथ जी मंदिरात २९ डिसेंबर, २०२२ रोजी अनंत – राधिकाचा रोका सेरेमनी संपन्न झाला होता. (Anant Ambani Radhika Engagement)

प्री-वेडिंग फंक्शन

रोका सेरेमनीनंतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. आता अंबानी – मर्चेंट फॅमिलीमध्ये प्री-वेडिंग फंक्शन सुरू झाले आहेत. याआधी मंगळवारी या कपलचा मेहंदी सोहळा पार पडला होता. या सोहळ्यातील फोटो समोर आले होते. आज साखरपुड्याचा कार्यक्रम मुकेश अंबानीच्या मुंबई येथील एंटीलियामध्ये पार पडणार आहे.

मेंहदी सोहळ्यात राधिकाने केला डान्स

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओत अंबानी फॅमिलीची होणारी सून राधिका डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोण आहे राधिका मर्चेंट?

राधिका ही बिझनेसमॅन विरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चेंटचे वडील एनकोर हेल्थकेअरचे CEO आहेत. भारतातील श्रीमंत व्यक्तीमध्ये त्यांच नाव घेतलं जातं. राधिकाचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ती न्यूयॉर्क गेली. तेथे तिने पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले. ती क्लासिकल डान्सरदेखील आहे. याशिवाय वाचन, ट्रेकिंग आणि पोहायलादेखील तिला आवडतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT