Latest

MS Dhoni Production House: एमएस धोनीची फिल्मी दुनियेत एन्ट्री! प्रॉडक्शन हाऊस केले सुरू

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni Production House) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, परंतु तो आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. तो अजूनही चेन्नईचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने आता फिल्मी दुनियेवर अधिराज्य गाजवण्याची तयारी सुरू केली आहे.

धोनीने प्रोडक्शन हाऊस केले सुरू

धोनीचा अद्याप हिरो बनण्याचा कोणताही विचार नसला तरी त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. माहीने त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव 'धोनी एंटरटेनमेंट' असे ठेवले आहे. LetsCinema ने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्विट एक फोटो देखिल शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये धोनी दिसत आहे. आणि त्या ट्विटमध्ये त्याने प्रोडक्शन हाऊसचे नाव देखील दिले आहे.

धोनी साऊथचा सुपरस्टार थलपती विजयसोबत चित्रपट करणार (MS Dhoni Production House)

धोनी आता फिल्मी दुनियेत येण्यासाठी सज्ज झाला असल्याची बातमी बऱ्याच दिवसांपासून समोर येत होती. या बातमीमध्ये असा दावाही करण्यात आला होता की, धोनी साऊथचा सुपरस्टार थलपती विजयसोबत एक चित्रपट करणार आहे. एवढेच नाही तर धोनी या चित्रपटात कॅमिओ देखील करू शकतो अशी अपेक्षा आहे. धोनीने साऊथ सुपरस्टार विजयला हा चित्रपट करण्यासाठी फोन केला आहे.

प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तीन भाषांमध्ये चित्रपट बनवले जाणार

महेंद्रसिंग धोनीच्या प्रोडक्शन हाऊसच्या पोस्टरनुसार त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तेलुगू, मल्याळम आणि तामिळमध्ये चित्रपट बनवले जाणार आहेत. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्यामुळे तामिळनाडूमध्ये त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. मागील काही आठवड्यात धोनी जाहिरातीमुळेही चर्चेत आला आहे. ओरियो बिस्किट त्याने टी २० वर्ल्ड कप २०२२ च्या आधी लाँच केले आहे. तो युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकरसोबत जाहिरातींमध्येही दिसला. धोनी नेहमीच त्याच्या शांत आणि सौम्य स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटही त्याच्यावर बनला आहे, ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतने काम केले आहे. धोनी २००८ पासून आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्यामुळे धोनी दक्षिणेतही खूप प्रसिद्ध आहे. माहीला थाला नावानेही संबोधले जाते.

हे ही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT