२०१९ विश्‍वचषक स्‍पर्धेत न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या सामन्‍यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद होताच टीम इंडियाच्या विजयाच्‍या आशा संपुष्टात आल्या होत्‍या. 
Latest

‘तो’ पराभव धोनीच्‍या जिव्‍हारी लागला, धाय मोकलून रडला! : माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा खुलासा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडियाचे दमदार प्रदर्शन सुरु आहे. भारताने या स्‍पर्धेतील सलग चार सामने जिंकले आहेत. मात्र गत विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताचा प्रवास उपांत्‍य फेरीतच संपुष्‍टात आला होता.  न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या सामन्‍यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) धावबाद होताच टीम इंडियाच्या विजयाच्‍या आशा संपुष्टात आल्या हाेत्‍या. त्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असलेले संजय बांगर ( Sanjay Bangar ) यांनी या सामन्‍यानंतर झालेल्‍या घटनेचा मोठा खुलासा केला आहे. रविवारी (२२ ऑक्टोबर) भारत-न्यूझीलंड सामन्यावेळी त्‍यांना या घटनेचे स्‍मरण झाले. (World Cup 2019 IND vs NZ)

धोनीसोबत हार्दिक आणि ऋषभलाही अश्रू अनावर

मागील विश्वचषक स्‍पर्धेत ११ जुलै २०१९ रोजी उपांत्‍य फेरीत न्‍यूझीलंड आणि भारत आमने-सामने होते. या सामन्‍यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद होताच टीम इंडियाच्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्‍याबाबत बोलताना बांगर म्‍हणाले की, गत विश्‍वचषकातील उपांत्य फेरीत पराभव लागला धोनीच्‍या जिव्‍हारी लागला. ड्रेसिंग रूममध्ये तो धाय मोकलून रडाला. धोनी बराच वेळ रडत राहिाला. धोनीसोबत हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतही रडत होते.

तो सामना धोनीच्‍या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला

"उपांत्य फेरीतील पराभवानंतर धोनीचे अश्रू थांबत नव्हते. पंत आणि हार्दिकही ड्रेसिंग रूममध्ये ढसाढसा रडत होते. तो सामना धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. यानंतर धोनीने भारतीय संघाची जर्सी घातली नाही, असे बांगर म्‍हणाले. (World Cup 2019 IND vs NZ)

World Cup 2019 IND vs NZ : उपांत्‍य सामन्‍यात काय घडलं हाेतं?

इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 50 षटकांत आठ गडी गमावून 239 धावा केल्या. पावसामुळे हा सामना दोन दिवसात पूर्ण झाला. खराब हवामान आणि पावसामुळे परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी याचा फायदा घेत भारताच्या सहा विकेट्स 92 धावांपर्यंत कमी केल्या. भारत मोठ्या पराभवाच्या जवळ होता. येथून धोनीने रवींद्र जडेजाच्या साथीने डावाला आकार दिला. धोनी आणि जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली होती. संघाच्‍या 208 धावांवर जडेजा बाद झाला. त्यानंतर 49व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनी धावबाद झाला आणि टीम इंडियाच्या आशा संपुष्टात आल्या. महेंद्रसिंह धोनी याने अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाचा डाव 49.3 षटकात 221 धावांवर संपुष्‍टात आला होता. पॅव्हेलियनमध्ये परताना धोनी रडत होता. तो आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते शक्य होत नव्हते. या वेदनादायी घटनेचे स्‍मरण आज बांगर यांनी करुन दिली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT