Latest

पीएसआय परिक्षेचा रखडलेला निकाल जाहीर; संभाजीनगरमधील सुनील महाराष्ट्रातून पहिला | MPSC PSI Result

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट मुख्य परीक्षा-२०२० पोलीस उप निरीक्षक पद (PSI Result) तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ४२७ गुण मिळवून सुनील खाचकड याने प्रथम क्रमांक आहे. तर, निर्मलकुमार भोसले यांना ४२५.५० तर द्वितीय क्रमांक तर गणेश जाधव यांना ४२५ गुण आहेत. त्यांचा तिसरा क्रमांक यादीत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून सातत्याने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी होत होती. अखेर आयोगाकडून मंगळवारी (दि. ४) या परीक्षेचा निकाल जाहीर करत यादी जाहीर केली आहे. आयोगाकडून ५८३ जणांची निवड यादी जाहीर केली आहे. तर गुणवत्ता यादीत १ हजार ७८२ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT