पुढारी ऑनलाईन : भाजपला ज्या-ज्या ठिकाणी भीती वाटते त्या ठिकाणी दंगे होतात. दंगली घडवण्यामागे कोणाचा हात हे सर्वांना माहिती आहे अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली. तसेच येत्या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ होणार असल्याचं भाकीत राऊत यांनी केलं.
बंगालमधील हिंसाचार हा भाजप पुरस्कृत असल्याची टीका करत, महाराष्ट्रात, कर्नाटकात जे चालले आहे. त्याच्या पाठिमागे भाजपचा हात असल्याचं ते म्हणाले. दरम्यान येत्या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ होणार असल्याचे ते म्हणाले.
कालची महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर मधली सभा उत्तम प्रकारे पार पडली. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित नव्हते यावर प्रश्न विचारल्यावर राऊत यांनी पटोले यांची प्रकृती ठिक नसल्याने ते सभेला येउ शकले नाहीत अशी सारवासारव केली. पुढच्या सभेला नाना पटोले असतील असे ते म्हणाले.
दरम्यान संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्राचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी काही लोक पंतप्रधानांच्या या डिग्रीला बोगस डिग्री असल्याचे म्हणतात. मात्र माझ्या मते 'Entire Political Science' शोध विषयावर ही ऐतिहासिक क्रांतिकारी पदवी आहे. या पदवी प्रमाणपत्राला फ्रेम करून नवीन संसद भवनाच्या मुख्य प्रवेशव्दारावर लटकवले पाहिजे. जेणेकरून लोक पंतप्रधानांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणार नाहीत.
पुढे बोलताना त्यांनी गौतम अदानींचा विषय अजुन संपलेला नसल्याचे स्पष्ट करत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोर्टाकडून न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा :