Jaya Bachchan  
Latest

Jaya Bachchan : …तू यापुढे जोरात पडशील: जया बच्चन फोटोग्राफरवर संतापल्या

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन  (Jaya Bachchan) यांना अनेक वेळा पापाराझींवर आणि प्रसारमाध्यमांवर राग काढल्याचे आपण पाहिले आहे. असाच प्रसंग पुन्हा एकदा घडला आहे. रविवारी रात्री जया त्यांची नात नव्या नवेली नंदासोबत एका फॅशन शोमध्ये गेल्या होत्या. शोमध्ये सहभागी झाल्यानंतर जया आणि नव्या एकत्र आल्यावर पापाराझींनी त्यांना घेरले आणि त्यांचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जया बच्चन संतापल्या. याच कारणामुळे त्यांनी अनेक पापाराझींवर राग काढला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) आपल्या नातीसोबत पुढे जाताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांनाही अनेक पापाराझींनी घेरले आहे. तेवढ्यात एक फोटोग्राफर अचानक अडखळतो, ज्याला जया म्हणतात, मला आशा आहे की, तू यापुढे याच्या पेक्षा मोठ्याने पडशील. जयांचा राग इथेच थांबत नाही. ती पुढे एका पापाराझीला त्यांच्या संस्थेचे नाव विचारते आणि जेव्हा तिला मीडिया हाऊसचे नाव कळते. तेव्हा त्या म्हणतात हे कोणते वर्तमानपत्र आहे? मात्र, यावेळी नव्या आजीला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जया बच्चन यांच्या या कृतीवर अनेक यूजर्सनी त्यांना ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले की, 'हे रागाचा मुद्दा खूप जास्त आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'वेडे लोक… अशा लोकांच्या मागे जा.' तिसऱ्या यूजर्सने लिहिले, 'पब्लिक त्यांना खूप मोठे बनवते.' या व्हिडिओवर अशाच आणखी काही कमेंट येत आहेत.
दरम्यान, यापूर्वी जया बच्चन 'केबीसी'मध्ये दिसल्या होत्या. यादरम्यान जया आणि अभिषेक बच्चन यांनी मिळून अमिताभ यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा आगामी चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT