पुढारी ऑनलाईन डेस्क : क्विंटन डी कॉक, व्हॅन डर डुसेन आणि मार्करम यांची तडाखेबाज शतके आणि अंतिम ओव्हरमध्ये डेव्हिड मिलर आणि क्लासेन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने ५० षटकांमध्ये ४२८ धावांचा डोंगर उभा केला. मार्करम १०६, क्विंटन डी कॉक १०० आणि व्हॅन डर डुसेन १०८ धावांच्या जाेरावर द. आफ्रिकेने श्रीलंकेसमाेर विजयासाठी विक्रमी ४२९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (SA vs SRI)
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेसमोर ४२९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आफ्रिकने ५० ओव्हरमध्ये ५ गडी गमावून ४२८ धावा केल्या आहेत. यामध्ये मार्करम १०६, क्विंटन डी कॉक १०० आणि व्हॅन डर डुसेन १०८ यांनी शतके केली. वन-डे वर्ल्डकपच्या इतिहासातील ४२७ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २०१५ साली मायदेशात झालेल्या वर्ल्डकपमधील पर्थ येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये ७ गडी गमावत ४१७ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेकडून तीन खेळाडूंनी शतके झळकावली. यामध्ये क्विंटन डी कॉक (१०० धावा), रॅसी व्हॅन डर डुसेन (१०८ धावा) आणि एडन मार्कराम (१०६ धावा) यांचा समावेश आहे. मार्करामने ४९ बॉलमध्ये शतक झळकावून वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. मार्को जॅनसेन १२ धावांवर नाबाद राहिला तर डेव्हिड मिलर २९ धावांवर नाबाद राहिला.
आफ्रिकेकडून दिलशान मधुशंकाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर दुनिथ वेल्लालागे, मथिशा पाथिराना आणि कसुन रजिथा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
(SA vs SRI)
अपडेट्स :
सामन्याच्या ४८ व्या ओव्हरमध्ये मार्करमच्या रूपात आफ्रिकेला पाचवा धक्का बसला. त्याला श्रीलंकेचा गोलंदाज मधुशंकाने रजिथा करवी झेलबाद केले. मार्करमने आपल्या खेळीत ५४ बॉलमध्ये १०६ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले.
श्रीलंकाविरूद्धच्या सामन्यात मार्करमने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४९ बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम मार्करमने आपल्या नावावर केला आहे. त्याने आपल्या शतकी खेळीत ४९ बॉलच्या सहाय्याने १०० धावा केल्या. यामध्ये त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले.
सामन्याच्या ४४ व्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला चौथाा धक्का बसला. श्रीलंकेचा गोलंदाज रजिथाने शनाकारवी हनरिच क्लासेनला बाद केले. क्लासेनने आपल्या आक्रमक खेळीत २० बॉलमध्ये ३२ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १ चौकार आणि ३ षटकार लगावले.
सामन्यातील ४१ व्या ओव्हरमध्ये आफ्रिकेना ३०० धावांचा टप्पा पार केला. यामध्ये व्हॅन डर डुसेनने सर्वाधिक १०८ धावांचे योगदान दिले. त्याला १०० धावांची खेळी करत क्विंटन डी कॉकने उत्तम साथ देत दुसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागिदारी रचली. क्विंटन डी कॉक आणि व्हॅन डर डुसेन बाद झाल्यानंतर एडन मार्करमने डावाची सुत्रे आपल्या हाती घेत धावफलक हलता ठेवला. त्याने ३४ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने ८ चौकार लगावले. मार्करम आणि क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी २९ बॉसमध्ये धावांची ५२ धावांची भागिदारी केली आहे.
सामन्याच्या ३८ व्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. श्रीलंकेचा गोलंदाज वेल्लालागेने समराविक्रमाकरवी व्हॅन डर डुसेनला झेलबाद केले. व्हॅन डर डुसेनने आपल्या शतकी खेळीत ११० बॉलमध्ये १०८ धावा केल्या. यामध्ये त्याने १३ चौकार आणि २ षटकार लगावले.
क्विंटन डी कॉकसोबत दुसऱ्या विकेटसाठी दोनशे धावांची भागिदारी करणाऱ्या रॅसी व्हॅन डर डुसेनने १०३ बॉलमध्ये आपले शतक केले. यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार लगावले.
सामन्याच्या ३१ व्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला क्विंटन डी कॉकच्या रूपात दुसरा धक्का बसला. त्याला श्रीलंकेचा गोलंदाज पाथिरानाने धनंजयकरवी झेलबाद केले. क्विंटन डी कॉकने आपल्या खेळीत ८४ बॉलमध्ये १०० धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि ३ षटकार लगावले. यासह डी कॉक आणि व्हॅन दर दुसेनने दुसऱ्या विकेटसाठी १७४ बॉलमध्ये २०४ धावांची भागिदारी केली.
१५ ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेने एक विकेट गमावून ८४ धावा केल्या आहेत. रॅसी व्हॅन डर डुसेन ४३ बॉलमध्ये ४२ आणि क्विंटन डी कॉक ४२ चेंडूत ३३ धावांवर फलंदाजी करत आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी होत आहे.
दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का १० धावांवरच बसला. कर्णधार टेंबा बावुमा आठ धावा करून बाद झाला. त्याला मधुशंकाने एलबीडब्ल्यू आऊट केले. सध्या रॅसी व्हॅन डर डुसेन आणि क्विंटन डी कॉक क्रीजवर आहेत. (SA vs SRI)
हेही वाचा :