Motorola Edge 40 Neo 
Latest

Motorola Edge 40 Neo लाँच; जाणून घ्या फिचर्स

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Motorola Edge 40 Neo हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. ५० मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सॉर यामध्ये असणार आहे. 65w फास्ट चार्जरही यासोबत मिळू शकतो. हा फोन २३,९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. मोटरोलाच्या लाँच झालेल्या या नव्या स्मार्टफोन बाबत आणखी जाणून घेऊयात…

Motorola Edge 40 Neo – किंमत आणि नवे फिचर्स

मोटरोलच्या 40 Neo या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची क्षमता आहे. हा फोन २३,९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. शिवाय हा फोन ब्लॅक ब्युटी, कॅनल बे आणि सुथिंग सी कलरमध्ये खरेदी करता येईल. कंपनीच्या भारतीय वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येऊ शकेल. त्याची विक्री २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. (Motorola Edge 40 Neo)

ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यावर ३ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. लॉन्च ऑफरमध्ये निवडक बँक क्रेडिट कार्ड आणि EMI वर १ हजार रुपयांची सूट असेल. या व्यतिरिक्त, विना-किंमत ईएमआय पर्याय प्रति महिना ३.५ हजार रुपयांपासून सुरू होतात. फोन ड्युअल सिमवर काम करते. यामध्ये Android 13 देण्यात आला आहे. या फोनचा रिफ्रेश दर 144 Hz आहे. यात 6.55 इंच फुल-एचडी प्लस डिस्प्ले आहे. पिक्सेल रिझोल्यूशन 1080×2400 इतके आहे. (Motorola Edge 40 Neo)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT