Mahindra Automobile : महिंद्रा कंपनीची कॅनडातील व्यवहारांवर बंदी | पुढारी

Mahindra Automobile : महिंद्रा कंपनीची कॅनडातील व्यवहारांवर बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम व्यवसायांवर दिसू लागला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कॅनडास्थित कंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनसोबतची भागीदारी संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडामधील कंपनीत महिंद्रा अँड महिंद्राची 11.18 टक्के भागीदारी आहे. वास्तविक, महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडामधील आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. महिंद्राचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत लोक महिंद्राच्या निर्णयाकडे याला जोडून पाहत आहेत. मात्र, कंपनीने ऐच्छिक आधारावर हा निर्णय घेतला आहे. कंपनी बंद केल्याने कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.

महिंद्राला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रेसन बंद केल्यानंतर, महिंद्राला 2.8 दशलक्ष कॅनेडियन डॉलर्स म्हणजेच 28.7 कोटी रुपये मिळतील. रेसन एरोस्पेस बंद झाल्यामुळे महिंद्राच्या व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही. भारत आणि कॅनडामध्ये तणाव सुरु झाल्यानंतर आज कंपनीकडून कॅनडातील व्यवहार बंद केले आहे. अशा स्थितीत या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ट्रुडो, खलिस्तानच्या बाबतीत स्वतःची बोट बुडू नका, जाणून घ्या भारताच्या तुलनेत कॅनडा किती मागे आहे.

Back to top button