Latest

Mother Remarried : लेकीने लावले ५० व्या वर्षी आईचे दुसरे लग्न; मुलीवर कौतुकाचा वर्षाव

अमृता चौगुले

शिलाँग; पुढारी ऑनलाईन : आपल्या देशात घटस्फोटानंतर किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुषांनी लग्न करणे हे सर्रास पाहिले जाते. पण, दुसरीकडे काही भागांमध्ये महिलांच्या दुसऱ्या लग्नाचा विचार अद्यापही तितकासा पुढाकार घेऊन केला जात नाही. महिलांच्या दुसऱ्या लग्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. तसेच अनेक ठिकाणी आपल्या समाजात असे काही लोक आहेत ज्यांना सनातनी विचारसरणी बदलायची आहे आणि ते पुढकार घेऊन तसे बदलही घडवून आणतात. (Mother Remarried)

सध्या अशीच एका घटनेची खूप चर्चा घडून येत आहे. पुरोगामी विचारसरणीच्या मुलीने अशी बुरसट परंपरा झुगारत आपल्या कृतीने समाजाला नवी दिशा देण्याचा, मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. तिच्या या गोष्टीचे चहुबाजूने कौतुक होत आहे. (Mother Remarried)

वास्तविक, आई-वडील सहसा आपल्या मुलांच्या लग्नाचे स्वप्न पाहतात, पण ही कथा एका लेकीची आहे जिने आपल्या आईच्या लग्नाचे स्वप्न पहात ते सत्यात उतरवले आहे. या मुलीने आपल्या आईचा दुसरा विवाह लावत तिचे एकाकी आयुष्य पुन्हा उजळवून टाकले आहे. (Mother Remarried)

ह्युमन्स ऑफ बॉम्बे यांनी मेघालयची राजधानी शिलाँग येथील रहिवासी असणाऱ्या देब आरती रिया चक्रवर्ती (Deb Arti Ria Chakravorty) आणि तिची आई मौसमी चक्रवर्ती यांची हृदयस्पर्शी कथा शेअर केली आहे. वास्तविक, रिया या फक्त 2 वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांची आई मौसमी 25 वर्षांच्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या मुलगी रियासोबत माहेरी गेल्या आणि तिथे राहू लागल्या. (Mother Remarried)

रियाचे पालनपोषणही त्यांच्या आजीच्या घरी झाले. रिया म्हणतात, सर्वांनी आईला दुसरे लग्न करायला सांगितले. पण, आईने कोणाचेच ऐकले नाही. ती एकच सांगायची की तिला नवरा मिळेल, पण माझ्या मुलीला बाप मिळणार नाही.

रिया चक्रवर्ती पुढे सांगतात, आईने तिच्या संगोपनात कधीही कोणतीही कमतरता पडू दिली नाही. हंगामी शिक्षक म्हणून काम करून त्यांनी आपल्या मुलीला जे काही देता येईल ते दिले. मुलांचे संगोपन करणे, ही एकट्या आईसाठी संघर्षाची गोष्ट असते. पण म्हणतात की, आई ही आई असते. मौसमी यांनी कुणालाही न जुमानता त्यांनी आपल्या मुलीला स्वत:च्या जीवावर मोठे केले. या धडपडीची रियाला पुर्ण कल्पना होती व ते तीने डोळ्यानी पाहिले होते. यामुळे रिया यांनी ठरवले की आईला सुद्धा सर्व सुखे देण्याचा प्रयत्न करायचा.

या दरम्यान रिया यांना त्यांच्या काकूचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, एक व्यक्ती आहे जी तिच्या आईला खूप आवडते. ही गोष्ट ऐकताच रिया या आनंदीत झाल्या. हे नाते सत्यात उतरले तर तिच्या आईला एक चांगला जोडीदार आणि आपल्याला एक बाप मिळेल. यानंतर आपल्या आईचे दुसरे लग्न करण्याचा रिया यांनी निर्णय घेतला.

रिया यांनी जेव्हा या बाबत आईला विचारणा केली तेव्हा तिच्या आईंनी त्यांना सांगितले. की, त्या एक म्युझिक ॲप सोबत संबंधित आहे. जिथे त्यांची स्वपन नावच्या व्यक्तीशी भेट झाली होती. मौसमी यांना स्वपन यांची गाणी खूप आवडतात व या द्वारे ते चांगले मित्र बनले. यावरुन त्यांच्या आईला स्वपन हे खूप आवडतात पण, त्या ही गोष्ट सांगू शकत नाहीत हे समजले. यानंतर रिया यांनी आईला प्रमाणे समाजावून सांगितले की, अजून खूप अजून खूप आयुष्य जगायचे आहे आणि तिला जगण्याची संधी दिली पाहिजे.

खूप समजावून सांगितल्यानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये, मौसमी यांनी त्यांना स्वपन आवडत असल्याचे कबूल केले. आईकडून हे ऐकून रिया यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानंतर रिया यांनी स्वपन यांच्याशी संवाद साधला. संवादादरम्यान स्वपन यांनी तुमच्या आईंना नेहमी आनंदीत ठेवेन असे वचन दिले. जे ऐकून रियाला आनंदासोबत एक वेगळाच दिलासा मिळाला.

दोघांच्या सहमती नंतर स्वपनच्या आणि मौसमी यांच्या कुटुंबीयांनी दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली. मौसमी यांना अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचे होते, पण रिया यांना आईचे लग्न भव्य व्हावे असे वाटत होते आणि याच विचाराने त्या लग्नाच्या खरेदीसाठी गुवाहाटीला गेल्या. रिया यांनी सांगितले की, लग्नाच्या दिवशी त्यांच्या आई मौसमी या खूप घाबरल्या होत्या. त्या लग्नात लाल रंगाचा पोशाख घालायला लाजत होत्या.

खरा सोबती मिळाल्याने मौसमी खूप आनंदीत 

लग्नानंतर रिया जेव्हा त्यांच्या आईशी बोलल्या तेव्हा त्यांना आईच्या आवाजात एक वेगळाच आनंद पाहायला मिळला. खरा जोडीदार मिळाल्याने मौसमी या खूप आनंदीत आहेत आणि रिया यांनाही त्याच्या वडिलांना भेटून आनंद झाला आहे. रिया म्हणतात की तिला शेवटी ते कुटुंब सापडले आहे, ज्याची त्यांना नेहमीच इच्छा होती. मात्र, आईचे दुसरे लग्न करून रियाने समाजाला नवी दिशा दिली आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT