Latest

Rishabh Accident : रक्‍तबंबाळ अवस्‍थेतही ऋषभ पंतने आईला दिला धीर : हसत म्‍हणाला, “या पेक्षा लहान…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऋषभ पंत याच्‍या कारला भीषण अपघात या वृत्ताने शुक्रवारी ( दि. ३० ) देशातील कोट्यवधी क्रिकेटरसिकाच्‍या काळजाचा ठोका चूकला. रक्‍तबंबाळ अवस्‍थेतील ऋषभ पंतचे फोटो व व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाल्‍याने या चिंतेत आणखी भर पडली. पोलिसांनी या घटनेची माहिती देताच ऋषभ पंतच्‍या आई सरोज पंत यांना मोठा मानसिक धक्‍का बसला. त्‍यांनी हॉस्‍पिटलकडे धाव घेतली. मात्र भीषण अपघातानंतरही ऋषभ मोठ्या धैर्याने सर्व परिस्‍थितीला सामोरे गेला. ( Rishabh Accident )  हॉस्‍पिटलमध्‍ये भेटायला आलेल्‍या आईचे त्याने नेहमीप्रमाणेच हसत स्‍वागत केले. आपल्‍या विनोदबुद्धीने हसवत सर्व काही ठीक होईल, असा धीरही त्याने आपल्या आईला दिला.

देहातचे पोलीस अधीक्षक स्‍वप्‍न किशोर सिंह यांनी सांगितले की, भीषण अपघातानंतरही ऋषभ पंत सर्व परिस्‍थितीला धैर्याने सामोरे गेला. आम्‍ही त्‍याच्‍याकडून आई सरोज पंत यांचा मोबाईल नंबर घेतला. त्‍यांना फोन केला. मात्र त्‍याचा फोन बंद (स्‍विच ऑफ) होता. यानंतर देहातमधील सिव्‍हिल लाइन्‍स पोलीस ठाण्‍यातील पोलिसांना लंढौरा अशोकनगरमधील ऋषभ पंतच्‍या घरी निरोपासाठी पाठविण्‍यात आले."

Rishabh Accident : आईची हॉस्‍पिटलकडे धाव

शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता ऋषभ पंतच्या कारला भीष‍ण अपघात झाला. यानंतर सहाच्‍या सुमारास पोलीस ऋषभच्‍या घरी गेले. त्‍यांना दरवाजा वाजवला. मात्र बराच वेळ त्‍यांना प्रतिसादच मिळाला नाही. अखेर सरोज पंत यांनी दरवाजा उघडला. पोलिसांनी त्‍यांना अपघाताची माहिती दिली. सरोज पंत यांना मोठा मानसिक धक्‍का बसला होता. त्‍या प्रचंड तणावात होत्‍या. ऋषभचे काही कपडे घेवून त्‍या पोलिसांबरोबर हॉस्‍पिटलमध्‍ये पोहचल्‍या.

ऋषभनेच दिला आईला धीर…

ऋषभचे कपडे घेवून आई सरोज हॉस्‍पिटलमध्‍ये पोहचल्‍या. रक्‍तबंबाळ अवस्‍थेतील मुलाला पाहून त्‍यांना मोठा मानसिक धक्‍का बसला. मात्र गंभीर जखमी असलेला ऋषभ काहीच झालेले नाही, असे सांगत आईचा तणाव कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला.

या वे‍ळी आईने आणलेल्‍या कपड्यांवरुन त्‍याने विनोदही केला "या पेक्षा लहान कपडे नव्‍हते का?", अशी हसत विचार करत त्‍याने आपल्‍या आईचा तणाव कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. एवढ्या मोठ्या अपघातानंतरही शांतपणे आणि हसतमुख चेहर्‍याने आपल्‍या आईला भेटणार्‍या ऋषभच्‍या धैर्याला उपस्‍थितांनी सलाम केला.

आजवर क्रिकेटरसिकांनी मैदानावर ऋषभचा बिनधास्‍त आणि मनस्‍वी खेळ अनुभवला आहे. मात्र भीषण अपघातानंतरही आप‍ण मानिसकदृष्‍ट्या कणखर असल्‍याचे ऋषभने दाखवले आहे. आता याच बळावर तो लवकरच मैदानावर उतरेल, असा विश्‍वास त्‍याचे चाहते व्‍यक्‍त करत आहेत.

हेही ‍वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT