Latest

Moscow concert hall attack | मॉस्को हल्ल्यात मोठी जीवितहानी! मृतांचा आकडा ११५ वर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी रशियातील राजधानी मॉस्को येथील क्रोकस सिटी या कॉन्सर्ट हॉलमध्ये शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली. या हल्ल्यातील मृतांचा आकडा ११५ वर गेला आहे. तर १८७ हून अधिक जखमी झाले आहेत. रशियन अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ११५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे रशियन तपास यंत्रणेने म्हटले आहे. (Moscow concert hall attack)

मॉस्को जवळील क्रोकस सिटी या प्रसिद्ध कॉन्सर्ट स्थळाच्या कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ISIS ने स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी बंदूक आणि स्फोटकांनी हल्ला केला. यात किमान ११५ जण ठार झाले आणि अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी ४४ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यात दोन मुलांचा समावेश असल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "क्रोकस येथील दहशतवादी हल्ल्यात एका मुलासह १६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. राशिया सरकारची वृत्तसंस्था आरआयए नोवोस्टीने दिलेल्या वृत्तानुसार, सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. तसेच त्यांनी ग्रेनेड आणि स्फोटके फेकली. ज्यामुळे आग लागली.

या प्रकरणी आतापर्यंत ११ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथील ढिगारे उपसण्याचे काम सुमारे ५०० कामगार करत आहेत. मॉस्को कॉन्सर्ट हॉल हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ जणांपैकी चार बंदूकधाऱ्यांचा हल्ल्यात थेट सहभाग होता, असे रशियाच्या सुरक्षा प्रमुखांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले.

रशियन तपास यंत्रणेने म्हटले आहे की, घटनास्थळी बचावकार्य सुरु असून हल्ल्यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत किमान ११५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. प्रादेशिक सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी या हल्ल्यात मरण पावलेल्या ३७ जणांची नावे जाहीर केली. (Moscow concert hall attack)

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT