नाशिक ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कार वितरणाप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, संजय पवार, गिरीश सहदेव, प्रा. रवींद्र कदम, डॉ. अविनाश धर्माधिकारी, सुनील ढगे. (छाया ः हेमंत घोरपडे) 
Latest

नाट्य क्षेत्रात महाराष्ट्रातील कलाकार अधिक – ना. छगन भुजबळ

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात नाट्य क्षेत्रात सर्वाधिक कलाकार हे महाराष्ट्र व त्या पाठोपाठ बंगालमधील असून, या दोन्ही राज्यांत नाट्यप्रेमी अधिक असल्याचे सांगत, नाशिककर कवी वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर व नटश्रेष्ठ बाबूराव सावंत यांच्या नावाने नाट्य पुरस्कार दिला जातोय, याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात नाट्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, लेखक संजय पवार, ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक गिरीश सहदेव, मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. अविनाश धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे आदी उपस्थित होते. ना. भुजबळ म्हणाले की, डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी नाट्य व लेखन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी नाट्य सृष्टीची अविरत सेवा केली आहे. मराठी नाट्य सृष्टी अजरामर करण्यात अनेक दिग्गज कलाकारांनी आपले योगदान दिले आहे. कार्यवाह सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले.

यांचा झाला सन्मान
वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्काराने लेखक संजय पवार यांचा प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने सिनेनाट्य अभिनेते व ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार, नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक गिरीश सहदेव यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्वर्गीय दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरुष ः दीपक करंजीकर, स्व. शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्री ः विद्या करंजीकर, स्वर्गीय प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शन ः प्रदीप पाटील, नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार लेखन ः दत्ता पाटील, स्व.वा.श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार – बाल रंगभूमी : सुरेश गायधनी, स्व. जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारिता धनंजय वाखारे, स्व. गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार – प्रकाशयोजना ः विनोद राठोड, स्व. प्रा. रामदास बरकले स्मृती पुरस्कार – लोककलावंत: जितेंद्र देवरे, स्व. शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार – शाहिरी पुरस्कार: राजेंद्र जव्हेरी, स्व. विजय तिडके स्मृती पुरस्कार – रंगकर्मी कार्यकर्ता राजेंद्र तिडके यांना प्रदान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते नारायण चुंबळे, निवृत्ती चाफळकर, संजय गिते, नितीन वारे, माजी आमदार जयवंतराव जाधव यांना विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT