mom movie fame sajal aly  
Latest

sajal aly : ‘मॉम’ फेम आर्या सबरवालचा नवा लूक, ओळखणार नाही!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

'मॉम' या चित्रपटात दिवंगत श्रीदेवी यांची सावत्र मुलगी आर्याची भूमिका सजल अलीने (sajal aly) साकारली होती. सजल अली (sajal aly) ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये ती लोकप्रिय आहे. 'मॉम'मध्ये दिसणारी आर्या सबरवालचा नवा लूक समोर आला आहे. लेटेस्ट फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसतेय.

सजल आता मोठी झाली आहे आणि पूर्वीपेक्षा खूपच स्टायलिश दिसते. सजलने २०१६ साली जिंदगी कितना हसीन है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सजलने २०२० मध्ये तिच्या प्रियकराशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

सजल अलीने अबू धाबीमध्ये तिचा प्रियकर अहद रझा मीरसोबत लग्न केले. सजल आणि अहद हे दोघेही पाकिस्तानचे मोठे सिनेस्टार आहेत. 'मॉम' चित्रपटातील सजलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटात श्रीदेवी आणि सजलशिवाय अदनान सिद्दीकी, अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केले होते.

अलीकडेच सजल ओटीटी प्लॅटफॉर्मवर जी5 वरील धूप की दिवार या नवीन मालिकेमुळे चर्चेत होती. या शोमध्ये सजल अली आणि अहद रझा मीर मुख्य भूमिकेत होते. ही पाकिस्तानी सीमापार प्रेमकथा आहे. धूप की दिवारची कथा प्रेम, कुटुंब आणि तडजोडीवर आधारित आहे. ही सीमा पार प्रेम कहाणी आहे. यामध्ये अहद रजा मीरने एक भारतीय विशाल आणि सजलने पाकिस्तानी मुलगी साराची भूमिका केली होती. दोघेही युद्धात आपल्या वडिलांना गमावतात. नशीब त्यांना जवळ आणते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT