Model Reshmi Nair 
Latest

Model Reshmi Nair : सेमी न्यूड फोटोशूट करणारी रेशमी नायर कोण आहे? मॉडेलवर टीकेचा भडिमार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी मॉडेल रेशमी नायरची चर्चा होत आहे. (Model Reshmi Nair) रेश्मी नायरने मध्य प्रदेशाच्या गढपहरा किल्ल्यात शीशमहलमध्ये फोटोशूट केला, त्यानंतर वाद निर्माण झाला. गढपहरा किल्ला परिसरात हनुमानाचे मंदिर आहे. त्याच परिसरात बोल्ड साडी नेसून तिने असा फोटोशूट केला की, तिच्यावर भडिमार होत आहे.  (Model Reshmi Nair)

मंदिर परिसारात अश्लिल फोटोशूट केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. रेशमी नायर एक प्रसिद्ध मॉडेल आहे. रेशमीने शीशमहल, बारादरी, रंगमहलमध्ये सेमी न्यूड फोटोशूट केले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने हे फोटो जुलै महिन्यात शेअर केले आहेत. रिपोर्टनुसार, या फोटोशूट विरोधक हिंदू संघटनेने रेशमीविरोधात कारवाईची मागणी केलीय.

ती केरळची राहणारी आहे. २०१९ मध्ये किशोरवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाखाली पॉक्सो ॲक्ट अंतर्गत तिला अटक झाली होती. ती बहुचर्चित 'किस फॉर लव्ह' अभियानादरम्यान चर्चेत आली होती. ती खूप बोल्ड सोशल मीडियावर अपलोड करत असल्याने अनेकदा तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT