Latest

‘फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे’ : याचिका घटनापीठाकडे वर्ग

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन – फाशीची शिक्षेसंदर्भातील सुनावणीवेळी शिक्षा कमी करण्यासाठीची स्थिती कधी आणि केव्हा असेल, या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे सोपवला आहे. सरन्यायाधीश यू. यू. लळित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट, सुधांशू धुलिया यांच्या पीठाने हा निर्णय घेतला आहे. (mitigating circumstances in death penalty cases)

"न्यायालयाची भूमिका अशी आहे की, अशा दोषींबद्दल खऱ्या अर्थाने आणि अर्थपूर्ण अशी सुनावणी होण्यासाठी स्पष्टतेची गरज आहे. आवश्यकता असेल तर ५ न्यायमूर्तींच्या पीठाकडे हा विषय सोपवला जावा. यासाठी सरन्यायाधीशांनी निर्णय घ्यावा." सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात स्वेच्छा दखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयांनी फाशीच्या शिक्षेबद्दल कशा प्रकारे निर्णय घ्यावेत, फाशीची शिक्षा द्यावी की नको आणि शिक्षा कमी करण्यासाठीची परिस्थिती या संदर्भातील ही याचिका आहे.

इरफान भय्यू मेवाती या व्यक्तीला स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायलयाने ही शिक्षा कायम केली आहे. एप्रिल महिन्यात सर्वोच न्यायलयात या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. त्यानंतर suo moto खटला ही या अनुषंगाने सुरू करण्यात आला. अशा खटल्यांत तपास अधिकाऱ्याने उभे केलेले आरोपीचे चित्र हे खरे मानले जाऊ नये, त्यापेक्षा कोर्टात सुनावणी वेळी ज्या साक्षी नोंदवल्या जातात, त्यावर आरोपीचे चित्र उभे राहिले पाहिजे, असा मुद्दा या सुनावणीवेळी करण्‍यात आला. फाशीची शिक्षा सुनावली जावी की नको अशी स्थिती जेव्हा असेल तेव्हा बचाव पक्षाला आरोपीची मुलाखती घेण्याची संधी असावी, त्यातून या आरोपीचे सर्वंकष विश्लेषण उभे राहू शकेल, असे मत न्यायालयाने मांडले होते.

हे सर्व मुद्दे विचारात घेऊन दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने दाखल केलेला अर्ज स्वतंत्र रिट पिटिशनमध्ये बदलण्यात आला. या प्रकरणात देशाचे महाधिवक्ता आणि नॅशनल लिगल सर्व्हिस अॅथॉरिटी यांना ही नोटिस बजावण्यात आली. या प्रकरणात न्यायमूर्तींना मदत करण्यासाठी सिद्धार्थ दवे आणि के परमेश्वरम या वकिलांची नियुक्तीही करण्यात आली. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल राखून ठेवत हा विषय मोठ्या पीठाकडे सोपवणे आवश्यक आहे, किंवा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच मार्गदर्शक तत्त्वे आखून द्यावीत, असे मत व्यक्त केले. पण या स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले पूर्वीचे काही निकाल प्रभावित होतील, असे नमूद करण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT