Latest

बिग बॉसनंतर मीरा जगन्नाथ-जय दुधाणे पहिल्यांदाच एकत्र

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस या रिअॅलिटी शोचा उपविजेता जय दुधाणे आणि याच शोधमील स्पर्धक असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र आले आहेत. "जोडी दोघांची दिसते चिकनी" हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर लॉन्च झाला आहे. या व्हिडिओमध्ये मीरा जगन्नाथ-जय दुधाणे सुंदर दिसताहेत.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी "जोडी दोघांची दिसते चिकनी" या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या नव्या दमाच्या गायकांनी हे गाणं गायलं आहे. राजेंद्र वैद्य कल्याणकर यांच्या शब्दांना अमेय मुळे यांनी स्वरसाज चढवला आहे. जोडी दोघांची दिसते चिकनी, कोलीवाऱ्याची राजा नी राणी असे शब्द असलेलं हे गाणं अतिशय श्रवणीय आहे. सहजपणे ओठी रुळणारे आणि उडती चाल ही गाण्याची वैशिष्ट्य आहेत.

एमटीव्हीवरच्या स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला. देखणा आणि उत्तम शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्यानं बिगबॉसच्या अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवलं. तर मीरानं माझ्या नवऱ्याची बायको आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकातून आपला अभिनय प्रवास सुरू केला. बिग बॉसमध्ये मीराचाही समावेश होता. बिग बॉसचा सीझन संपल्यानंतर मीरा आणि जय पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओतून एकत्र झळकले आहेत.

साईनाथ राजाध्यक्ष निर्मित "तुझी माझी यारी" या प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या वेबसिरीजमध्ये मीरा जगन्नाथने मुख्य भूमिका केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT