Latest

उजनीचा पाणीसाठा मायनस! गतवर्षीपेक्षा ३६ दिवस अगोदरच गाठला तळ 

backup backup

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा :  पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यात हरितक्रांती, धवल क्रांती, औद्योगिक तसेच कृषी औद्योगिक क्रांती घडवून आणणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा शनिवारी (दि. ६) "मायनस" (-उणे) पातळीत गेला आहे. मागील वर्षापेक्षा तब्बल ३६ दिवस अगोदर धरणात "मायनस" पाणी पातळी तयार झालेली आहे. यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे.

गेल्या वर्षी १३ जून रोजी उजनी धरण मायनसमध्ये आले होते. सध्या पाणी पातळी ४९१.०१५ मीटर असून एकूण साठा १७९९.८५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६३.५५ टीएमसी मृतसाठा (डेड स्टॉक) उपलब्ध आहे. तर टक्केवारी "मायनस" (उणे) ००.०१२ टक्के अशी झाली आहे.
धरण जलाशयातील पाणी पातळी ४९१.०३० मीटर जाते, तेव्हा ० टक्के जिवंत पाणीसाठा असतो व त्याखालील पाणी साठा "मायनस" मध्ये गणला जातो. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी उजनी जलाशयात १११.२३ टक्के पाणी व १२३.२८ टीएमसी पाणीसाठा तयार झालेला होता. या एकूण साठ्यातील ६३.५६ टीएमसी मृतसाठा तर ५४.८२ टीएमसी जिवंत पाणीसाठा असतो.

सध्या उजनी कालव्यातून ३ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याच्या सद्यस्थितीमुळे मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात रोहिणी आणि मृग नक्षत्रांचा पाऊस पुरेशा प्रमाणात नाही पडला नाही, तर जून आणि जुलै मध्ये शेतीसाठी भीषण पाणीटंचाई जाणवेल.

 पाणी सोडण्याचे नियोजन ढासळले

आतापर्यंत गेल्या ८ महिन्यात ६० टीमसी पाण्याचा वापर केला गेला आहे. त्यात यावर्षी गतवर्षीपेक्षा पाणी सोडण्याचे नियोजन ढासळले असल्याने यावर्षी उजनीने लवकर तळ गाठला आहे. उजनी धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने व दहा औद्योगिक वसाहती चालतात. तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांचा पाणीपुरवठा याच धरणाद्वारे होतो. हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय देखील होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, अर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.

सध्या यावर्षी उजनी धरणातील पाणीपातळी खालीलप्रमाणे :-

एकूण पाणीपातळी – ४९१.३० मीटर

एकूण पाणीसाठा -१८०२.८२ दशलक्ष घनमीटर

उपयुक्त साठा – ०.०१ दशलक्ष घनमीटर
एकुण पाणीसाठा – ६३.६६ टीएमसी

उपयुक्त साठा – ००० टीएमसी
टक्केवारी – – ०.०५ टक्के

विसर्ग नदी – बंद

कालवा – ३ हजार क्युसेक
बोगदा – ५५० क्यूसेक

दहिगाव १०० क्यूसेक

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT