plastic 
Latest

Microbes Discover : प्लास्टिकची समस्या सुटणार! शास्त्रज्ञांनी शोधले कमी तापमानात प्लास्टिक पचवणारे सूक्ष्मजीव

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Microbes Discover : आजच्या काळात संपूर्ण जगातील सर्वात मोठी समस्या म्हणजे प्लास्टिकचा कचरा. ज्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येत नाही त्या प्लास्टिकचे विघटन कसे करावे, ही सगळ्या जगाची डोकेदुखी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ या समस्येचे उत्तर शोधत आहे. त्यावर अनेक जणांनी आपआपल्या परीने उत्तर शोधत आहे. मात्र, आता ही प्लास्टिकची समस्या सुटण्याची शक्यता आहे. कारण शास्त्रज्ञांनी कमी तापमानात प्लास्टिक पचवणारे सूक्ष्मजीव शोधून (Microbes Discover) काढले आहेत. द गार्डियनने याबाबतचे वृत्त दिले आहे.

प्लास्टिक खाणारे अनेक सूक्ष्मजीव यापूर्वी देखील शास्त्रज्ञांना सापडले (Microbes Discover) आहेत. मात्र ते केवळ 30C पेक्षा जास्त तापमानातच कार्य करू शकतात. त्यामुळे औद्योगिदृष्टीने त्यांचा वापर करणे अत्यंत महागाचे ठरते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले प्लास्टिक खाणारे सूक्ष्मजीव हे 15C वर देखील हे करू शकतात. त्यामुळे या सूक्ष्मजीवांच्या पुनर्वापरात प्रगती होऊ शकते. स्वस फेडरल इन्स्टिट्यूट WSL च्या शास्त्रज्ञांनी या सूक्ष्मजीवांचा शोध लावला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष इन मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

Microbes Discover : असे केले संशोधन

डब्ल्यूएसएलमधील डॉ जोएल रुथी आणि सहकाऱ्यांनी ग्रीनलँड, स्वालबार्ड आणि स्वित्झर्लंडमध्ये जमिनीत एक वर्षासाठी ठेवलेल्या मुक्त पडलेल्या किंवा हेतुपुरस्सर गाडलेल्या प्लास्टिकवर वाढणाऱ्या 19 जीवाणूंचे आणि 15 बुरशीचे नमुने घेतले. त्यांनी सूक्ष्मजंतूंना प्रयोगशाळेत 15C तापमानात अंधारात सिंगल-स्ट्रेन कल्चर म्हणून वाढू दिले आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक पचवू शकतात का हे पाहण्यासाठी त्यांची चाचणी केली. (Microbes Discover)

परिणामांवरून असे दिसून आले की जिवाणूचे प्रकार फायला ऍक्टिनोबॅक्टेरिया आणि प्रोटीओबॅक्टेरियामधील 13 पिढ्यांचे होते आणि फायला एस्कोमायकोटा आणि म्यूकोरोमायकोटा मधील बुरशी 10 प्रजातींशी संबंधित आहेत. (Microbes Discover)

चाचणी केलेल्या प्लास्टिकमध्ये नॉन-बायोडिग्रेडेबल पॉलीथिलीन (PE) आणि बायोडिग्रेडेबल पॉलिस्टर-पॉलीयुरेथेन (PUR) तसेच पॉलिब्युटीलीन अॅडिपेट टेरेफ्थालेट (PBAT) आणि पॉलीलेक्टिक ऍसिड (PLA) चे दोन व्यावसायिकरित्या उपलब्ध बायोडिग्रेडेबल मिश्रण समाविष्ट होते.

Microbes Discover : प्रयोगातील निष्कर्ष

या प्रयोगात असे दिसून आले की, या प्लॅस्टिकवर १२६ दिवस उष्मायन केल्यानंतरही कोणताही स्ट्रेन पीई पचवू शकला नाही. परंतु 11 बुरशी आणि आठ जीवाणूंसह 19 स्ट्रेन (56%), 15C वर PUR पचवण्यास सक्षम होते, तर 14 बुरशी आणि तीन जीवाणू PBAT आणि PLA चे प्लास्टिक मिश्रण पचवण्यास सक्षम होते.

शास्त्रज्ञ रुथी म्हणाले की, "आम्हाला असे आढळून आले की अल्पाइन आणि आर्क्टिक मातीच्या 'प्लास्टीस्फीअर'मधून मिळवलेले नवीन सूक्ष्मजीव टॅक्‍स 15C तापमानावर जैवविघटनशील प्लास्टिकचे विघटन करण्यास सक्षम होते. हे जीव प्लॅस्टिकसाठी एन्झाइमॅटिक रिसायकलिंग प्रक्रियेचा खर्च आणि पर्यावरणीय भार कमी करण्यास मदत करू शकतात.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT