Menstrual Hygiene Day 
Latest

Menstrual Hygiene Day: २८ मे राेजीच का साजरा करतात मासिक पाळी स्वच्छता दिन? 

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :

पाळी म्हटलं की आजही लोकांच्या भूवया उंचावतात. स्त्रीचे महिन्याच्या मासिक पाळीचे 'हे चार' दिवस आजही तिच्या पुरते मर्यादीत आहेत असे म्हंटल तर वावग ठरणार नाही. थोडक्यात हे दिवस तेरे भी चूप और मेरे भी चूपवाले आहेत. मागील काही वर्षांमध्‍ये परिस्थिती बदलत असली तरी याचे प्रमाण खूप कमी आहे. आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. हा मे महिन्याच्या २८ मे राेजीच का साजरा करतात हे जाणून घेवूया… (World Menstrual Hygiene Day)

Menstrual Hygiene Day : मासिक पाळी स्वच्छता दिन

आजही आपल्याकडची परिस्थिती पाहता मासिक पाळीवर बिनधास्तपणे आणि जाहीरपणे  बोलणं टाळलं जातं. पाळी म्हटलं की कुजबूज  ऐकायला मिळते. बहूतांश महिला आजही मासिक पाळीच्या संबधित माहीतीबद्दल अनभिज्ञ आहेत. मासिक पाळी आल्यानंतर घ्यावयाची काळजी, पाळी येण्या गोदर आणि नंतर आपल्या शरीरात होणारे बदल, मानसिकतेत होणारे बदल, आजार याबद्दल माहिती नाही किंवा अपूरी आहे. ही परिस्थिती फक्त ग्रामीण भागातच आहे का ?  तर अजिबात नाही शहरातही फारशी वेगळी परिस्‍थिती नाही. महिलांनी मासिक पाळीच्या दिवसात कशी स्वच्छता घ्यायची याबद्दल माहीती मिळावी, त्यांच्यात जागरूकता वाढावी यासाठी हा दिन मे महिन्याच्या २८ तारखेला साजरा केला जातो.

Menstrual Hygiene Day

मे महिन्याची २८ तारीखच का?

'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' (World Menstrual Hygiene Day 2022) दरवर्षी  मे महिन्याच्या २८ तारखेला साजरा करतात. सर्वप्रथम, २०१४ मध्ये मध्ये एका एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यास सुरुवात केली. साधारणपणे, महिलांच्या मासिक पाळीचे चक्र हे  २८ दिवसांचे असते. रक्तस्त्राव  साधारणपणे ४ ते ५ दिवस होत असतो. म्हणूनच हा दिवस इंग्रजी वर्षातील पाचव्या महिन्यांची म्हणजे मे महिन्याच्‍या २८ तारखेलाच  साजरा करतात.

मासिक पाळीदरम्यान अशी घ्या काळजी

१. मासिक पाळी दरम्यान तुम्ही जर सुती कापड वापरात असाल तर ते कापड स्वच्छ असु द्या. ते कापड स्वच्छ धूवा. वाळवताना प्रकाशात वाळू द्या
२. सॅनिटरी पॅड वापरत असाल तर साधारणपणे दर चार ते सहा तासांनी बदला. कारण एकच पॅड बराच वेळ वापरणे आरोग्यासाठी हानिकारक बनू शकते. खाज आणि संसर्गही होऊ शकतो.
३. टॅम्पॉनचा वापर करत असाल तर तीन ते चार तासांनी बदला.
४. मासिक पाळी दरम्यान असो वा इतरवेळी तुम्ही अंतर्वस्त्रे स्वच्छ घाला.
५. मासिक पाळी दरम्यान सकस आहाराबरोबरचं व्यायामावर भर द्या. योग्य तज्ञांच्या सल्ल्याने सकस आहार घ्या आणि व्यायाम करा.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT