पुढारी ऑनलाइन डेस्क : Medical College : नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी बोर्डाने तपासणीदरम्यान या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्याने केंद्र सरकारने देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. तसेच अशी तब्बल 150 वैद्यकीय महाविद्यालये अजूनही रडारवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आतापर्यंत ज्या 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ती पंजाब, गुजरात, तामिळनाडू, आसाम, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. सध्या इतर वैद्यकीय महाविद्यालयांचीही चौकशी सुरू असून, ही महाविद्यालयेही तपासादरम्यान दर्जेदार न राहिल्यास त्यांचीही मान्यता रद्द होऊ शकते.
या महाविद्यालयांमध्ये कॅमेरा, बायोमेट्रिक हजेरी, प्राध्यापक आदी महत्त्वाच्या गोष्टींचा अभाव आढळून आल्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हे पाऊल उचलले आहे. या महाविद्यालयांमध्ये गेल्या महिनाभरात केलेल्या तपासणीत या त्रुटी आढळून आल्या आहेत. मात्र, आतापर्यंत ज्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे, त्यांना अपील करण्याचा पर्याय आहे.
ज्या महाविद्यालयांची मान्यता आतापर्यंत रद्द करण्यात आली आहे त्यांना अपील करण्याचा पर्याय आहे. त्यांना हवे असल्यास, मान्यता रद्द झाल्यापासून पुढील ३० दिवसांच्या आत ते राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पहिले अपील करू शकतात. ही महाविद्यालये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे दुसरे अपील करू शकतात. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि मंत्रालयाने महाविद्यालयांकडून प्राप्त अपील दोन महिन्यांत निकाली काढायचे आहेत.
हे ही वाचा :