Latest

MCC Life Membership : धोनीसह पाच भारतीय क्रिकेटपटूंना एमसीसीचे आजीवन सदस्यत्व!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला क्लबचे आजीवन सदस्यत्व देऊन सन्मानित केले आहे. धोनी व्यतिरिक्त भारताच्या इतर पाच क्रिकेटपटूंनाही क्लबने हा सन्मान बहाल केला आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, सुरेश रैना, मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या नावाचा समावेश आहे.

क्रिकेटचे नियम करणाऱ्या लंडनस्थित एमसीसीने 19 नवीन मानद आजीवन सदस्यांची घोषणा केली. क्लबने भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्या पुरुष आणि महिला खेळाडूंचाही या यादीत समावेश केला आहे.

2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. युवराज आणि रैना त्या संघाचे सदस्य होते. एमसीसीच्या अधिका-यांनी सांगितले की, 'आम्ही एमसीसीच्या मानद आजीवन सदस्यांच्या आमच्या नवीनतम गटाची घोषणा करताना आनंदी आहोत. आज जाहीर केलेली नावे आधुनिक काळातील महान आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. आम्हाला अभिमान वाटतो की आता आम्हाला आमच्या क्लबचे मौल्यवान सदस्य म्हणून त्यांची गणना करण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे.'

एमसीसीकडून 'या' खेळाडूंचा सन्मान

मेरिसा अगुइलेरा : वेस्ट इंडीज (2008-2019)
एमएस धोनी : भारत (2004-2019)
झुलन गोस्वामी : भारत (2002-2022)
जेनी गन : इंग्लंड (2004-2019)
मोहम्मद हाफीज : पाकिस्तान (2003-2021)
रेचेल हेन्स : ऑस्ट्रेलिया (2009-2022)
लॉरा मार्श : इंग्लंड (2006-2019)
इऑन मॉर्गन : इंग्लंड (2006-2022)
मशरफे मोर्तझा : बांगलादेश (2001-2020)
केविन पीटरसन : इंग्लंड (2005-2014)
सुरेश रैना : भारत (2005-2018)
मिताली राज : भारत (1999-2022)
एमी सॅटरथवेट : न्यूझीलंड (2007-2022)
अन्या श्रबसोल : इंग्लंड (2008-2022)
युवराज सिंग : भारत (2000-2017)
डेल स्टेन : दक्षिण आफ्रिका (2004–2020)
रॉस टेलर : न्यूझीलंड (2006–2022)

आणखी वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT