पुढारी ऑनलाईन डेस्क : Mazhi Tuzhi Reshimgaath : झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून मालिकेचा दिवसेंदिवस टीआरपी वाढत आहे. या मालिकेतून श्रेयस तळपदे (यश) आणि प्रार्थना बेहरे (नेहा) छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या क्युट जोडीने मालिकेत साकारलेल्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. या दोघांव्यतीरिक्त मालिकेतील मायरा वाकुळ उर्फ परीने प्रेक्षकवर्गाची मने जिंकली आहेत. चिमुकलीचा मालिकेतील वावर प्रेक्षकांना मालिका पाहण्यास भाग पाडत आहे.
यश आणि नेहाची चांगली मैत्री जमली आहे. त्याला नेहाचा सहवास हवाहवासा वाटत आहे. यश नेहाच्या प्रेमात पडलाय की काय अशी वातावरण निर्मिती मालिकेत करण्यात आली आहे. पण सध्याच्या मालिकेतील भागामध्ये काही वेगळच घडत आहे. नेहा यशपासून काहीतरी लपवत आहे. ती खोट यश सोबत खोट बोलून परांजपे वकीलांसोबत जाते. पण नेहा खोटं बोलत असल्याचे यशच्या लक्षात येते. त्यामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतात. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहा फोनवर बोलत असते. तिचं ते बोलणं ऐकून यशचा गैरसमज होतो. त्यामुळे यश नेहाने आणलेला डबा खात नाही. तो डबा कॅन्टीनच्या टेबलवर ठेवून निघून जातो. यावेळची यशची रिॲक़्शन पाहून यश आणि नेहा यांच्यातील गैरसमजामुळे ते एकमेकांपासून कायमचं दुरावणार का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
नेहाच्या शेजारी एक वयस्कर काका-काकू राहतात. नेहाच्या मुलीचा म्हणजेच परीचा ते दोघे प्रेम, आपुलकीने जीवापाड सांभाळ करतात. पण काही दिवसांपूर्वी त्यातील बंडू काका यांचे एका घटनेमुळे मानसिक स्वास्थ बिघडते. त्यातच काकू नेहाला दुसरं लग्न करण्यासाठी तिच्या मागे तगादा लावतात आणि तसं वचनही घेतात. नेहा भावनिक होऊन काकूंना दुसरं लग्न करण्याचे वचन देऊन बसते. दुसरीकडे परांजपे वकील नेहाशी लग्न करण्यासाठी आतुरलेला आहे. तो काहीना काही कारणं पुधे करून नेहाची भेट घेत असतो. दरम्यान, यश बाबत एक सुन्न करणारी घटना घडते. परी जी यशची फ्रेंड आहे, ती यशसाठी दररोज एक लहानशी चपाती करून नेहासोबत डब्यात पाठवत असते. मात्र, यावेळी परीच्या लहानश्या चपातीचा डबा परांजपे वकिलांकडे जातो. याविषयाचे नेहा आणि परांजपे वकीलांचे बोलणे यश ऐकतो. आणि त्याला याचा धक्का बसतो. यशच्या वाटणीची परीने पाठवलेली चपाती दुस-याच्या डब्यात गेल्यामुळे यश नाराज होतो आणि नेहाने दिलेला डबा कॅन्टीनच्या टेबलवर ठेवून निघून जातो. यानंतर नेहा त्याठिकाणी येते आणि यशने ठवलेला डबा हातात घेते. तिला याबाबत काहीच कळत नाही. मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी धक्का देणारा असेल.