Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहाच्या लगीनघाईत मोठा ट्विस्ट! यश करणार परांजपेची धुलाई  
Latest

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहाच्या लगीनघाईत मोठा ट्विस्ट! यश करणार परांजपेची धुलाई

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका ठरली आहे. मालिकेने नुकतेच शंभर भाग पूर्ण केले आहे. सध्या मालिकेत ट्विस्ट पहायला मिळत आहे. चिमुकली परीची आई अर्थात नेहाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. कपटी असणा-या परांजपे वकीलाने नेहाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर बंडू काका आणि त्यांच्या पत्नी अर्थात काकू यांच्या अग्रहाखातर नेहा या लग्नास तयार होते. त्यानंतर नेहा आणि परांजपे वकिलाच्या लग्नाची तयारी आता सुरु झाली आहे. नेहा मनाविरुध्द लग्न करतेय. दुसरीकडे, यश नेहाचे लग्न होत असल्याने आतून झुरतोय. तर आपलं नेहाशी लग्न होणार म्हणून परांजपे वकील भलताच खुश आहे. पण लवकरच या लगीनघाईत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेमध्ये प्रार्थना बेहेरे हिने देखील अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. प्रार्थना बेहेरे हिने नेहाची भूमिका साकारली आहे. नेहा यशच्या ऑफिसमध्ये नोकरीला असते, तर संकर्षण कराडे याने देखील या मालिकेमध्ये समीरची भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या साकारली आहे. तसेच या मालिकेमध्ये मोहन जोशी यांनी आजोबांची भूमिका अतिशय जबरदस्त रित्या साकारली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये लक्ष वेधून घेते ती म्हणजे परी. परीची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली आहे. ही भूमिका बालकलाकार मायरा वायकूळ हिने साकारली आहे.

नेहाला साधेपणाने लग्न करयाचे असते. पण नुकत्याच झालेल्या भागामध्ये, नेहाची बेरकी वहिनी तिला लग्नाच्या खरेदीसाठी परांजपे याच्याकडे हट्ट धरते. यावर परांजपे देखील आपण खरेदी करू असे म्हणतो. त्यावर नेहा म्हणते की, एवढी गडबड काय आहे, मला साधेपणाने लग्न करायचे आहे. त्यामुळे खरेदी काही करायची नाही, असं ती सांगते. पण तिची बेरकी वहिनी काही ऐकताना दिसत नाही. परीही तिचे मत व्यक्त करत आई आपण कपडे घ्यायला जाऊ असे नेहाला म्हणते. त्यामुळे नेहा सुद्धा खरेदीसाठी तयार होते आणि ऑफिसमध्ये फोन करून कळवते की ती आज ऑफिसला येणार नाही.

दरम्यान, एकीकडे नेहा आणि परांजपे वकिलाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे यशला परांजपे वकिलाच्या कुरापतींबाबत सगळी माहिती मिळते. त्यामुळे तो येणाऱ्या काही भागांमध्ये परांजपे वकिलाची बेदम धुलाई करणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. याबाबत नुकताच खुलासा करण्यात आला आहे. याबाबतचे फोटोही शेअर झाले आहेत. त्यामुळे आता परांजपे वकिलाचे सत्य बाहेर पडणार असल्याचे दिसते. कटकारस्थान करून आणि खोटे बोलून त्याने नेहा सोबत लग्न ठरवले असल्याचे समोर येत आहे. यामध्ये नेहाची वहिनी हिचा देखील हात असल्याचे कळते. त्यामुळे आता यश हा परांजपेची धुलाई करणार हे नक्की आहे.

झी मराठीवर सुरू असलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. मालिकेने नुकतेच शंभर भाग पूर्ण केले असून अभिनेता श्रेयस तळपदे याने एक व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांचे खूप आभार मानले आहेत. यापुढेही मालिकेवर असेच प्रेम करा, असे त्याने म्हटले होते. एकूणच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे याने यशची भूमिका साकारली आहे. अनेक वर्षानंतर त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. श्रेयस तळपदे याने आपल्या करिअरची सुरुवात आभाळमाया सिरीयल मधूनच केली होती. त्यावेळेस ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतून त्याने पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्याला अनेक मराठी मालिका आणि चित्रपट मिळाले. सावरखेड एक गाव चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. या चित्रपटातही त्याने धमाकेदार असे काम केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT