राहुरी : पुणे येथे घेतलेल्या फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी माहेरहून अडीच लाख रूपये आणावेत, म्हणून विवाहित तरूणीला शिवीगाळ करून तिचा शारीरीक व मानसीक छळ केला. ही घटना राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे घडली.
प्राजक्ता विक्रम पवार (वय 26, रा. दुर्गापुर, ता. राहाता, हल्ली रा. मुंजोबानगर राहुरी बु. ता. राहुरी) या विवाहित तरूणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 18 जानेवारी 2020 पासून नोव्हेंबर 2021 पर्यंत प्राजक्ता पवार सासरी दुर्गापुर येथे नांदत होती. दरम्यान पुणे येथे घेतलेल्या फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी तिच्या वडिलांकडून अडीच लाख रूपये आणावेत. या कारणावरून तसेच घरातील बारीक सारीक गोष्टीवरून तिला उपाशी पोटी ठेवले. तिला शिवीगाळ करुन शारीरिक मानसीक छळ केला.
सर्व त्रासाला कंटाळून प्राजक्ता पवार हिने राहुरी पोलिसांत धाव घेऊन तिच्यावर होत असलेला अन्याय पोलिसांना सांगितला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत विक्रम मधुकर पवार, पुष्पा मधुकर पवार, मधुकर बाबुराव पवार, आशिष मधुकर पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.