Maratha reservation 
Latest

Maratha reservation : जरांगे- पाटील यांच्या आंदोलनावर रितेश देशमुखने शेअर केली पोस्ट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठा आंदोलनकर्ते  मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज  (दि.२९) सहावा दिवस आहे. त्यांची  प्रकृती खालावली असल्याने मराठा समाजासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अभिनेते रितेश देशमुख यांनीह साेशल मीडियावर पाेस्‍ट शेअर करत चिंता व्यक्त म्हटलं आहे, त्‍यांनी म्‍हटले आहे की, "जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. " (Maratha reservation)

फोटो साभार रितेश देशमुख यांच्या 'X' अकाउंटवरुन

Maratha reservation : या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल?

गेले काही दिवस राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चर्चेत आहे. मराठा आंदोलनकर्ते सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतरही सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत. आजचा (दि.३०) उपोषणाचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या बाबतीत काळजी व्यक्त करत अभिनेते रितेश देशमुख यांनी  आपल्या 'X' खात्यावर पोस्टसह जरांगे पाटील यांचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. "

किती वेळ हवा आहे, हे तरी कळू दे : जरांगे- पाटील

मला समाजापेक्षा कुणीही मोठं नाही, फक्त पुरावे असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावे, सरसकट मराठ्यांना दाखले द्यावेत, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.३०) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलून दाखविला. जरांगे-पाटील म्हणाले की, मी आंदोलन थांबवणार नाही, असे विखे- पाटील यांना फोनवरून सांगितले आहे. परंतु मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मी आज पाणी घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणासाठी थोडा म्हणजे अजून किती वेळ हवा आहे, हे तरी कळू दे, असेही ते म्‍हणाले.

आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा आहे. १ नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आता सोसायटीतही निवडून येणार नाहीत, असा दावा करून पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचे थांबवावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाचाळ माणसांना आवर घालावा, आमच्या वाटेला गेला, तर मराठे सोडणार नाहीत, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला. आमच्या आंदोलनाला कुणी तरी गालबोट लावत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT