मला वेळ मिळत नाही किंवा मला श्वास घ्यायलाही वेळ नाही अशी अनेक वाक्ये सांगून आपण वेळेच्या बाबतीत नेहमी रडगाणे गात असतो. लग्न किंवा काही विशेष कार्यक्रम असले की, आपण वेळ नसल्याची थाप मारून त्या ठिकाणी जायचे टाळतो. खरं तर प्रत्येकाला आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी योग्य तो वेळ मिळू शकतो. वेळेची कमतरता कोणालाही नसते. फक्त वेळेचा योग्य प्रकारे वापर करणे महत्त्वाचे आहे. टाईम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचा योग्य प्रकारे वापर आणि आपल्या जीवनातील रोजच्या नियमितपणाच्या सहाय्याने आपण योग्य तो वेळ योग्य त्या कामासाठी देऊ शकतो. (time management tips)
दैनंदिन जीवनात नियमितपणा आणि शिस्त या दोन गोष्टी असतील, तरच आपल्या इच्छेप्रमाणे काम करण्यासाठी आपल्याला ताकद मिळू शकते. कोणतंही काम शिल्लक राहणार नाही, सगळी कामं पूर्ण होऊनही वेळ शिल्लक राहू शकतो. खूप कामं असतील, तर प्रत्येक कामासाठी ठरावीक वेळ दिला, तर वेळेची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे या गोष्टीवर भर देणे महत्त्वाचे आहे. जे काम खूप आवश्यक आहे, त्याला प्राधान्य देऊन त्याला ठरावीक वेळ देणे आवश्यक आहे. (time management tips)
याप्रमाणे कामांची एक यादी करावी. त्यामध्ये आपल्याकडे असणारी व्यवस्था, क्षमता आणि साधन यांचा विचार करून प्रत्येक कामाला ठरावीक वेळ द्यावा आणि तो लिहून ठेवावा.
दिवसाच्या शेवटी कामाचा आढावा घेताना कोणतं काम कमी वेळात आणि योग्य प्रकारे झालं, याकडे लक्ष द्या. जी कामं पटकन करायची आहेत, त्यावर तुमची बारीक नजर असणे महत्त्वाचे आहे. तेथेही जर आपण काम योग्य प्रकारे करू शकत असाल, तरच ते हातात घेणे चांगले नाही, तर ते काम अपूर्ण राहिलं, तर त्यासाठी परत वेळ काढावा लागतो.
अशी कामे उद्यावर ढकलली जातात आणि अशा प्रकारे कामांचा बोजा वाढत जातो. त्यामुळे नियोजन करतानाच अचूक आणि प्रॅक्टिकली करा. हे नियोजन यशस्वी झाल्यानंतर उरलेल्या वेळेचं काय करायचं, याचाही विचार करा; पण त्या वेळेत लगेचच आणखी काम घेण्याचं टाळा.
हेही वाचा :