पुढारी ऑनलाइन डेस्क : Scam : एका २४ वर्षीय युवा वकिलाला बिअर ऑनलाइन बीअर मागवणे चांगलेच महागात पडले आहे. ३६० रुपयांच्या बिअरसाठी त्याने ४४ हजार ७८२ रुपये गमावले. ही फसवणूक व्हॉट्स ॲपवरून झाली आहे. मुंबईतील एका २४ वर्षीय वकिलाने याबाबत तक्रार दिली आहे.
Scam : इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवकाला बिअर मागवायची होती. त्यामुळे त्याने ऑनलाइन जवळपास असलेल्या वाइन दुकानांचा शोध घेतला. जे त्याला घरी डिलवरी देतील. शोध घेतल्यानंतर त्याला जवळचेच एक दुकान सापडले. त्याने ब-याच वेळा त्या नंबरवर कॉल केला. मात्र, कोणी फोन उचलला नाही. थोड्या वेळाने त्याला एका नंबरवरून कॉल आला. त्याने तुमची बिअरसाठी ऑर्डर आहे का विचारून त्यांचे शॉप घरी डिलवरी देईल असे त्याने सांगितले. नंतर त्याने व्हॉट्स अॅपवरून ऑर्डर करायला सांगितले.
Scam : त्यानुसार वकिलाने व्हॉट्स अॅपवर एक बोटल बिअरची ऑर्डर दिली. मात्र, त्याला मेसेज आला की त्यांना कमीतकमी ३६० रुपयांची दोन बिअर होम डिलिवरीसाठी ऑर्डर करावी लागेल. तसेच ३० रुपये एक्स्ट्रा डिलिवरी चार्ज द्यावा लागेल. त्यानुसार त्याने दोन बिअरच्या ऑर्डर दिल्या. नंतर त्याला या फसवणूक करणा-याने एक क्यूआर कोड पाठवला तसेच त्याला पेमेंट करायला सांगितले.
हे सर्व वकिलाला विश्वासार्ह वाटत असतानाच, घोटाळेबाजाने दोन बिअरचे बिल घेण्यासाठी वकिलाला ४९९९ रुपये भरण्यास सांगितले. तसेच त्यांच्या बँक खात्यातून एकही पैसा कापला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी वकिलाला दिले. त्याने कोड स्कॅन करताच त्याच्या बँक खात्यातून ४९९ आणि ४९९९ रुपये कापण्यात आले, घोटाळेबाजाने केलेल्या दाव्याच्या उलट. जेव्हा वकिलाने त्याला त्याचे पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा त्याला दुसरा क्यूआर कोड पाठवला गेला ज्यामुळे त्याचे अधिक नुकसान झाले. वकिलाने परतावा मिळवण्यासाठी कोड वारंवार स्कॅन केला आणि 44,782 रुपये गमावले.
Scam : वकिलाने जेव्हा पैसे परत मागण्यासाठी कॉल केला तेव्हा त्याचा कॉल लागत नव्हता. नंतर या घोटाळेबाजने वकिलाला व्हॉट्स अॅप वर ब्लॉक केले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच वकिलाने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणात, घोटाळेबाजाने त्याला बिल तयार करण्यासाठी ४९९९ रुपये भरण्यास सांगितले तेव्हा वकिलाने सावध व्हायला हवे होते. कोणताही ऑनलाइन किंवा ऑफलाइन विक्रेता बिल तयार करण्यासाठी पैसे मागत नाही. आपले पैसे गमावत आहेत हे लक्षात आल्यावर त्याने कोड स्कॅन करत राहू नये.
हे ही वाचा :