पुढारी ऑनलाईन डेस्क : शेजारी राहणार्या व्यक्तीच्या तब्बल १,१०० कोबड्या मारल्याप्रकरणी चीनमधील एकाला
न्यायालयाने सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासंदर्भात न्यू यॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे. एकाचवेळी
तब्बल ११०० कोंबड्यांना ठार मारण हा शेजार्याचा बदला घेण्यासाठी केलेले कृत्य होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यूयॉर्क पोस्टने चायना डेलीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील हुनान प्रांतातील हेंगयांग काउंटीमधील दोन शेजारी राहणार्या कुटुंबामध्ये झाडे तोडण्यावरुन एप्रिल २०२२ पासून वाद सुरु झाला. शेजारी राहणार्या झोंग यांच्या शेतात गो घुसले त्यांनी कोंबड्यांना घाबरवण्यासाठी फ्लॅशलाईटचा वापर केला. फ्लॅशलाइटमुळे कोंबड्या घाबरल्या. यावेळी कोंबड्याची चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ४६० कोंबड्या मारल्या गेल्या. झोंग यांनी केलेल्या तक्रारीनंतर झोंग यांना ३ हजार युआन (भारतीय चलनात 35,734 रुपये) दंड ठोठावण्यात आला. यामुळे शेजारी झोंग यांच्याबद्दल आणखीनच संतापला. या दंडाच्या कारवाईचा बदला घेण्याचा प्रयत्न करताना 640 कोंबड्या मारल्या गेल्या.
११०० मृत कोबंड्यांची किंमत सुमारे 13,840 युआन (1,64,855 रुपये) असल्याचा अंदाज चिनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हे. चायना डेलीनुसार, मध्य चीनच्या हुनान प्रांतातील हेंगयांग काउंटीमधील न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला की, झोंग याच्या शेजार्यांनी जाणूनबुजून मालमत्तेचे नुकसान असून, या प्रकरणी आरोपीला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा :