Latest

“खेळ अजून संपलेला नाही” ! राष्ट्रपती निवडणुकीबाबत ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत भाजपला इशारा दिला आहे. भाजपने चार राज्यांत नुकताच मोठा विजय मिळवला असताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला राष्ट्रपती पदाची निवडणूक सोपी नसेल, असे म्हटले आहे. 'खेळ अजून संपलेला नाही' असे म्हणत त्या पुढे म्हणाल्या की, विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतरही समाजवादी पक्ष अगोदरपेक्षा मजबूत स्थितीत आहे.

भारतीय जनता पक्षाकडे देशातील संसद सदस्यांच्या निम्मे सदस्यही नाहीत. विरोधी पक्षांकडे देशभरात भाजपपेक्षा जास्त सदस्यसंख्या आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणूक भाजपसाठी सोपी नसेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रातील सत्तारूढ पक्षाच्या विरोधात उभे राहण्यासाठी देश तयार असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधात ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या विजयानंतर त्या भाजपविरोधात विरोधीपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT