Latest

Kotak-GetSetUp : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी कोटकची गेटसेटअपसोबत भागीदारी

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने ('केएमबीएल'/कोटक) कोटक ग्रॅण्‍ड सेव्हिंग्‍ज प्रोग्रामसह ज्‍येष्‍ठ नागरिकांना विविध आरोग्‍य व वेलनेस अनुभव देण्‍यासाठी पीअर-टू-पीअर प्‍लॅटफॉर्म गेटसेटअपसोबत सहयोग केला आहे. या उपक्रमांतर्गत ज्‍येष्‍ठ नागरिकांना आरोग्‍य, पोषण, वेलनेस इत्‍यादींमधील हजारो क्‍लासेस, इव्‍हेण्‍ट्स व अनुभव विशेष उपलब्‍ध होतील आणि या प्रक्रियेत समुदायाचा भाग बनतील, तसेच त्‍यांच्‍या सदस्‍यत्‍वाचा भाग म्हणून ख-या संबंधांना चालना मिळेल. Kotak-GetSetUp

नॅशनल स्‍टॅटिस्टिकल ऑफिस (एनएसओ)च्‍या एल्‍डर्ली इन इंडिया २०२१ अहवालानुसार भारतातील वृद्ध व्‍यक्‍तींची संख्‍या (६० वर्ष व त्‍यापेक्षा अधिक वय) दशकभरात ४१ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २०२१ मधील १३८ दशलक्षवरून २०३१ मध्‍ये १९४ दशलक्षपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. गेटसेटअप सदस्‍यत्‍वासह कोटक ग्रॅण्‍डचे ग्राहक इंटरअॅक्टिव्‍ह व सर्वसमावेशक क्‍लासेसच्‍या माध्‍यमातून आयोजित करण्‍यात येणाऱ्या आजीवन शिकण्‍याच्‍या विविध अनुभवांचा आनंद घेऊ शकतात. मुंबई, पुणे व अहमदाबाद येथे सुरूवातीला पायलट प्रोग्राम म्‍हणून लाँच करण्‍यात आलेला हा उपक्रम गेटसेटअप व्‍यासपीठावरील मोफत सदस्‍यत्‍वाच्‍या माध्‍यमातून भारतभरात कोटक ग्रॅण्‍डच्‍या ग्राहकांपर्यंत विस्‍तारित करण्‍यात येईल. Kotak-GetSetUp

कोटक महिंद्रा बँकेच्‍या रिटेल लाय‍बिलिटीजचे अध्‍यक्ष व वितरण प्रमुख पुनीत कपूर म्‍हणाले, "आमची ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या आरोग्‍यावर लक्ष केंद्रित करत त्‍यांना प्रशंसित करण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. गेटसेटअपसोबत सहयोग करत आम्‍ही कोटक ग्रॅण्‍ड ग्राहकांना आरोग्‍यदायी व समाधानकारक जीवन जगण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी सामाजिक सहभाग उपक्रम राबवत आहोत."

गेटसेटअपच्‍या बिझनेस डेव्‍हलपमेंट अॅण्‍ड पार्टनरशीप्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अश्विनी कपिला म्‍हणाले, "५५ वर्ष व त्‍यावरील वयोगटातील ज्‍येष्‍ठ नागरिकांना सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले समुदाय व्‍यासपीठ गेटसेटप संसाधनांचा खजिना आहे, जो त्‍यांच्‍या इंटरअॅक्टिव्‍ह, वैयक्तिकृत कोर्सेस व अनुभवांच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारतो. हा सहयोग कोटक ग्रॅण्‍ड सेव्हिंग्‍ज प्रोग्रामच्‍या ग्राहकांना अनेक संपन्‍न अनुभव आणि कौशल्‍य निर्माण करण्‍याच्‍या संधी देईल."

कोटक ग्रॅण्‍ड सेव्हिंग्‍ज प्रोग्राम ५५ वर्ष व त्‍यावरील वयोगटातील ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा प्रोग्राम अनेक ऑफरिंग्‍ज देतो, जसे शाखांमध्‍ये प्रायोरिटी सर्विस, होम-बँकिंग सुविधा, कोटक रिवॉर्डस्, लॉकर रेण्‍टल्‍सवर सूट, ओव्‍हरड्राफ्ट सुविधा, हेल्‍थकेअर फायदे आणि इतर अनेक. कलिनरी अॅडवेन्‍चर्सपासून आर्ट सेमिनार्सपर्यंत आणि वेलनेस क्‍लासेसपासून उत्‍साहवर्धक एक्‍सरसाइजपर्यंत कोटक ग्रॅण्‍ड ग्राहक आता स्‍वयंशोधाचा व कौशल्‍य वाढीचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या वैयक्तिक विकासाला चालना मिळण्‍यासह जीवनाचा दर्जा सुधारेल.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT