Latest

Mahashivratri : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिवलिंगाची शासकीय महापूजा उत्साहात

backup backup

भीमाशंकर ; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची शासकीय महापुजा सोमवारी (दि. २८) मध्यरात्री १२ वाजता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सपत्नीक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सपत्नीक यांच्या हस्ते झाली. भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. (Mahashivratri)

दोन वर्षानंतर भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. भीमाशंकर महादेव मंदिर आकर्षक फुलांची सजावट व विदयुत रोषणाईने उजळून निघाले असून, भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर व प्रशासन सज्ज झाले आहे.

महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन महत्त्‍वाचे मानले जात असल्याने भाविक दोन दिवस आधीच भीमाशंकरमध्ये मुक्कामी येतात. पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी दर्शनबारीसह मुखदर्शन व पासची सुविधा भाविकांसाठी देवस्थानतर्फे करण्यात आली आहे. (Mahashivratri)

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आदिवासी प्रकल्पस्तरीय अध्यक्ष सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त, भीमाशंकर कारखान्याचे श्री बेंडे-पाटील, प्रांताधिकारी सांरग कोडलकर, घोडेेगावचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, खेड व आंबेगावचे तहसीलदार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT