Vidhan Bhavan Pudhari
महाराष्ट्र

Vidhan Bhavan: धक्कादायक घटना! विधानभवन परिसरात घुसला; अंगावर रॉकेल ओतून जीवन संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Vidhan Bhavan: मुंबईतील विधानभवनाबाहेर एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Rahul Shelke

Vidhan Bhavan: मुंबईतील विधानभवन परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. विधानभवनाच्या बाहेर एका व्यक्तीने स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने पोलिसांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले आणि मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. संबंधित व्यक्ती अचानक विधानभवनाच्या परिसरात आली आणि अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न करू लागली. हा प्रकार लक्षात येताच तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांनी त्या व्यक्तीला थांबवत ताब्यात घेतले आणि त्याला पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

घटनेमुळे विधानभवन परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेमागचे नेमके कारण काय आहे, तसेच त्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलण्याचा का प्रयत्न केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, विधानभवन परिसर हा संवेदनशील भाग मानला जात असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमुळे विधानभवन परिसरातील सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT