विदर्भ

चंद्रपूर : विद्यूत तारांना स्पर्श होऊन इलेक्ट्रिक दुकानदाराचा शेतात मृत्यू

अमृता चौगुले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतात येऊन पिकांची नुकसान करणाऱ्या जंगली डुकरांच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या विद्यूत प्रवाहाला स्पर्श होऊन एका इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा मृत्यू झाला. ही घटना सावली तालुक्यातील चांदली येथे घडली. प्रमोद चतारे असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली.

सावली तालुक्यातील चांदली येथील प्रमोद चतारे यांनी शेतात विविध पिकांची लागवड केली आहे. मात्र जंगली डुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत. यामुळे ते त्रस्त आहेत. जंगली डुकरे शेतपिकांची नुकसान करीत असल्याने चतारे यांनी स्वत:चे शेतात झटका मशीन लावली होती. दरम्यान, काल रात्रीला ते शेतावर पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, अनावधानाने त्यांचाच त्या झटका मशिनच्या तारांना स्पर्श झाला. त्यामुळे ते तारांनाच चिटकून राहिले आणि त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

दरम्‍यान, रात्री ते शेतावरून घरी परत न आल्याने सोबत आलेल्‍या एकाने शेतात जावून पाहिले असता, तो शेतात पडलेला दिसला आणि त्याचा विद्यूत तारांना स्पर्श झालेला होता. मृत्‍यु झालाने सावली पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT