विदर्भ

चंद्रपूर : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; २ ठार १ गंभीर

अमृता चौगुले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सिंदेवाही-मूल महामार्गावर व सिंदेवाही पासून ६ किमी अंतरावर सरडपार येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक एक युवक व एक युवती असे दोघे ठार तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली.

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार या गावा लगत एका अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जबर धडक दिल्याने मूल तालुक्यातील राजोली येथील सेजल अनिल कुंभारे (वय २०) व सुमित अलोने (वय २३, दोघे रा. डोंगरगाव ता.मूल) हे दोघे जागीच ठार झाले.

अक्षय लेनगुरे (रा.डोंगरगाव, ता.मूल) हा गंभीर जखमी असून त्याला सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास सिंदेवाही पुलिस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहे. अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल केला असून अज्ञात वाहनाचा शोध सिंदेवाही पोलिस करीत आहे.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT