अभियंता तरुणीने गळफास घेऊन संपविले जीवन  File Photo
यवतमाळ

Yavatmal News : अभियंता तरुणीने गळफास घेऊन संपविले जीवन

मारेगाव येथील घटना; मृत्यूचे कारण अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : औरंगाबाद येथे अभियंता असलेल्या २७ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपविले. ही घटना गुरुवार (दि.८) मारेगाव सकाळी शहरातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये उघडकीस आली. दीक्षा केशव उमरे (वय २७) असे जीवन संपविलेल्या तरुणीचे नाव आहे.

शहरांतील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये वास्तवास असलेले केशव उमरे हे आरोग्य विभागात कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांना दोन मुली आहेत. मृत दीक्षा ही औरंगाबाद येथे खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होती. ती काही दिवसांपासून वर्क फॉर होम काम करीत होती. बुधवारी (दि.७) रात्री जेवण करून सगळे आपआपल्या खोलीत झोपी गेले. सकाळी दीक्षा ही झोपेतून उठली नाही, म्हणून आईने आवाज दिला. आवाज देऊनही मुलगी प्रतिसाद देत नसल्याने आईने खोलीत डोकावून पाहिले असता ती गळफास घेतल्याचे दिसून आले. तत्काळ तिला बेशुद्धवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT